Meat Ads Ban : ‘या’ शहरात सार्वजनिक ठिकाणी मांसाच्या जाहिरातींवर बंदी, जाणून घ्या कारण

Meat Ads Ban
Meat Ads Ban
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : खाद्यपदार्थांवरील हवामानाच्या प्रभावामुळे नेदरलँड्समधील हार्लेम शहरात (Dutch city of Haarlem)  सार्वजनिक ठिकाणी मांसाच्या जाहिरातींवर बंदी (Meat Ads Ban) घालण्यात आली आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी मांसाच्या जाहिरातींवर बंदी घालणारे हे जगातील पहिले डच शहर ठरले आहे.

अॅमस्टरडॅमच्या पश्चिमेला असलेले आणि सुमारे 160,000 लोकसंख्या असलेले हार्लेम, 2024 पासून हवामानाच्या संकटाला कारणीभूत असणाऱ्या  उत्पादनांच्या यादीत मांसाचा समावेश केल्यानंतर ही बंदी लागू करेल. हार्लेमच्या बसेस आणि सार्वजनिक जागांवर पडद्यावर जाहिरातींना परवानगी दिली जाणार नाही.

मांसाच्या जाहिरातींवर बंदी घालण्याच्या प्रस्तावाचा मसुदा तयार करणार्‍या ग्रोएनलिंक्स (GroenLinks) पक्षाच्या पार्षद झिग्गी क्लाझेस म्हणाल्या की, जेव्हा त्यांनी हे धोरण प्रस्तावित केले तेव्हा असे धोरण लागू करणारे हे शहर जगातील पहिले असेल हे माहित नव्हते. त्या असेही म्हणाल्या की, "मांस हे पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक आहे. हवामानाचे संकट आहे आणि त्यांना त्याचा भाग असलेली उत्पादने खरेदी करण्यास  लोकांना  प्रोत्साहित करू शकत नाही. या प्रस्तावाला ख्रिश्चन डेमोक्रॅटिक चॅलेंज पक्षाच्या खासदारांनीही पाठिंबा दिला आहे.

कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेणारी जंगले जनावरांना चरण्यासाठी तोडली जातात, तर त्यांचे खाद्य वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खतांमध्ये नायट्रोजन असते. ज्यामुळे हवा आणि जल प्रदूषण, हवामान बदल आणि ओझोन वायू कमी होतो. पशुधन देखील मोठ्या प्रमाणात मिथेन, एक शक्तिशाली हरितगृह वायू तयार करते. हे सर्व हवामान संकटाला घातक आहे.

Meat Ads Ban : या निर्णयालाही विरोध… 

काही लोक, संस्था, पक्ष या निर्णयासंबंधी नाराजी व्यक्त करत आहेत. हार्लेम बीव्हीएनएलचे नगरसेवक जॉय रेडमेकर म्हणाले, "अशा जाहिरातींवर बंदी घालणे हुकूमशाही आहे," तर ग्रोनिंगेन विद्यापीठातील कायद्याचे प्राध्यापक हर्मन ब्रॉरिंग म्हणाले, ही बंदी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन करू शकते आणि घाऊक विक्रेत्यांकडून खटलेही दाखल होऊ शकतात.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news