बेळगाव : वनमंत्री उमेश कत्ती यांचे निधन; शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर | पुढारी

बेळगाव : वनमंत्री उमेश कत्ती यांचे निधन; शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार आणि वन मंत्री उमेश कत्ती यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६१ वर्षाचे होते. मंगळवारी संध्याकाळी बंगळूर येथील डॉलर्स कॉलनी येथील निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा तिसरा झटका आला. यानंतर त्‍यांना एम एस रामय्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मंगळवारी संध्याकाळी बंगळूर येथील डॉलर्स कॉलनी येथील निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर एम एस रामय्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव बंगळूरहून विशेष विमानाने सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान बेळगाव विमानतळ येणार असून, बेळगावनंतर ते हुक्केरी येथील हिरा शुगर्स येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर सायंकाळी ५ वाजता बेल्लद बागेवाडी येथे अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

हुक्केरी विधानसभा मतदार संघातून नऊ वेळा त्‍यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यापैकी आठ वेळा ते जिकले होते. उत्तर कर्नाटकचा मुद्दा त्यांनी उचलून धरला होता. मंत्री उमेश कत्ती यांच्या निधनाने बेळगाव जिल्ह्यातील सर्व शाळा कॉलेजला, शासकीय कार्यालयांना आज (बुधवार) सुट्टी देण्यात आलेली आहे.

हेही वाचा : 

Back to top button