Marriage to Blanket : ब्लँकेटशी लग्न करून तरुणीने थाटला संसार

Marriage to Blanket : ब्लँकेटशी लग्न करून तरुणीने थाटला संसार

लंडन : कुटुंब, मित्र आणि बॉयफ्रेंडच्या साक्षीने एका ब्रिटिश तरुणीने चक्क ब्लँकेटशी लग्न (Marriage to Blanket) करून संसार थाटल्याची आश्चर्यजनक घटना घडली आहे. पास्कल सेलिक असे या तरुणीचे नाव आहे. हे ब्लँकेटच तिचे पहिले प्रेम होते. त्याने पहिल्या नजरेतच तिच्या मनाचा ठाव घेतला होता, असे ती सांगते.

तिच्या या लग्नाचा व्हिडीओ जोरात व्हायरल झाला आहे. यासाठी लपूनछपून नव्हे, तर जाहीरपणे लग्न समारंभही पार पडला. पहिल्या नजरेतच ब्लँकेटच्या प्रेमात पडले आणि त्यालाच विश्वासू साथीदार मानते, असे तिचे म्हणणे आहे. इंग्लंडमधील एक्सेटरमध्ये हा लग्न समारंभ पार पडला. पास्कलच्या म्हणण्यानुसार, ब्लँकेट तिच्या मित्रासारखे आहे. सुख-दुःखात ते तिच्यासोबत असते. प्रियकराबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ती म्हणते, मी ब्लँकेटशी लग्न का केले, हे त्याने समजून घेतले आहे. माझा बॉयफे्रंड जॉनी मला समजून घेतो. एक खास संदेश देण्यासाठी ब्लँकेटशी लग्न केल्याचे तो जाणतो. आमचे नाते खरोखर प्रेमळ असल्याचे तिचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news