Tata Tech IPO | तब्बल १९ वर्षानंतर येतोय ‘टाटा’ कंपनीचा IPO, गुंतवणूकदारांना कमाईची संधी!

Tata Tech IPO | तब्बल १९ वर्षानंतर येतोय ‘टाटा’ कंपनीचा IPO, गुंतवणूकदारांना कमाईची संधी!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : तब्बल १९ वर्षानंतर टाटा समुहातील (Tata Group) आणखी एक कंपनी बाजारात सूचीबद्ध होण्यासाठी सज्ज झाली आहे. बाजार नियामक सेबीने (Markets regulator Sebi) टाटा टेक्नॉलॉजीजच्या (Tata Technologies) इनिशिअल पब्लिक ऑफर (IPO) ला मान्यता दिली आहे. जवळपास दोन दशकांनंतर टाटा समुहाचा येत असलेला हा पहिला आयपीओ असणार आहे.

टाटा समुहातील या कंपनीने मार्चमध्ये सेबीकडे आयपीओ पेपर्स दाखल केले होते. हा इश्यू पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) आहे; ज्या अंतर्गत विक्री करणारे शेअरहोल्डर्स ९.५७ कोटी इक्विटी शेअर्सची विक्री करतील. यात टाटा मोटर्सचे ८.११ कोटी, अल्फा टीसी होल्डिंग्सचे ९७.२ लाख कोटी, टाटा कॅपिटल ग्रोथ फंड-१ चे ४८.६ लाख कोटी शेअर्स विकण्याची योजना आहे. (Tata Tech IPO)

हा IPO बहुप्रतिक्षित आहे. कारण १९ वर्षांनंतर इश्यू होणारा टाटा समूहाचा पहिला आयपीओ आहे. टाटा समूहाचा शेवटचा IPO जुलै २००४ मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चा होता. टाटा मोटर्सची टाटा टेकमध्ये ७४.६९ टक्के, अल्फा टीसी होल्डिंग्सची ७.२६ टक्के आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड १ ची ३.६३ टक्के भागीदारी आहे.

Tata Motors ची उपकंपनी Tata Technologies ही एक प्ले इंजिनीअरिंग सेवा फर्म आहे; जी उत्पादन विकास आणि डिजिटल अभियांत्रिकी सोल्यूशन्स प्रदान करते. ज्यात एलईडी व्हर्टिकलच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केले जाते. कंपनीला त्याचा बहुतांश महसूल ऑटोमोटिव्ह व्हर्टिकल (७५ टक्के मिक्स) मधून मिळतो आणि टाटा मोटर्स आणि जग्वार लँड रोव्हर हे त्यांचे अँकर क्लायंट आहेत.

या आयपीओचा आकार नेमका किती आहे हे अद्याप उघड करण्यात आलेले नाही. पण बाजारातील सूत्रांनी अंदाज व्यक्त केला आहे की हा इश्यू किमान ४ हजार कोटी रुपयांचा असू शकतो. बुक-रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून बुक-बिल्डिंग प्रक्रियेद्वारे ऑफर केलेल्या इक्विटी शेअर्सच्या बाजारातील मागणीच्या मूल्यांकनाच्या आधारावर त्याची प्राईस बँड निश्चित केली जाणार आहे.

सुमारे ५० टक्के ऑफर पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB) राखीव असेल, ३५ टक्के इश्यू किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि १५ टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल. बाजारात सूचीबद्ध नसलेला टाटा टेक हा NSE आणि रिलायन्स रिटेल नंतरचा सर्वात जास्त चर्चेत असलेला स्टॉक आहे. (Tata Tech IPO)

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news