महाराष्ट्राची हास्यजत्रा- दे धक्का २ मधून एकापेक्षा एक कलाकारांचा चमू भेटीला

maharshtrachi hasyjatra de dhakka 2
maharshtrachi hasyjatra de dhakka 2

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' १५ ऑगस्टपासून परत येतो आहे. आठवड्यातले चारही दिवस हास्यरसिकांना हा कार्यक्रम बघायला मिळणार आहे. पण, या आठवड्यात खास रसिकांसाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- दे धक्का-२ विशेष हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. 'दे धक्का-२' या चित्रपटाचा संपूर्ण चमू हास्यजत्रेच्या मंचावर येणार आहे. त्यामुळे दर्जेदार प्रहसने, नृत्ये आणि गाणी असं सगळं रसिकांना बघायला मिळणार आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर खुद्द निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर येणार आहेत. प्रेक्षकांना अनेक लोकप्रिय चित्रपट देणारे महेश मांजरेकर हास्यजत्रेच्या मंचावर हास्यरसिकांना मनापासून दाद देत, खळखळून हसताना दिसतील. याबरोबरच ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे यांचीही उपस्थिती या मंचावर असणार आहे. मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांनी प्रहसनात काम केलं असल्यानं त्यांचं हास्यवीरांबरोबरचं काम बघणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

याबरोबरच मेधा मांजरेकर, गौरी इंगावले, सक्षम कुलकर्णी, अमेय खोपकर हे कलाकार हास्याच्या मंचावर उपस्थित राहून खळखळून हसणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news