शिवानी रांगोळेने योगदिनाच्या शुभेच्छा देत सांगितले फिट राहण्याचे रहस्य

shivani rangole
shivani rangole

पुढारी ऑनलाईन डेस्क : दरवर्षी २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. योग आपल्या रोजच्या जीवनशैलीत फार महत्वाचा भाग आहे. आपल्या भारतीय संस्कृतीतही योगाचे अनन्यसाधारण महत्व आहे. आरोग्य आणि वजनाच्या बाबतीत योग ही अनेक लोकांची पहिली पसंती आहे. योग दिनाच्या या निमित्ताने "तुला शिकवीन चांगलाच धडा" ह्या मालिकेतील अक्षरा अर्थात शिवानी रांगोळेने आपल्या रोजच्या जीवनात योगाचे किती महत्व आहे याबाबतीत सांगितले. "

योग हा माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिनक्रम आहे. मी रोज अर्धा तास योगा करते. योगामुळे मला माझे मन शांत करण्यास मदत होते आणि दिवसभर मला उत्साही ठेवते. मी दिवसभरात श्वासाचे आवागमन करत असते. ज्यामुळे माझा श्वास नियंत्रणात राहण्यास मदत होते. भुजंगासन हे माझे आवडत आसन आहे, कारण सतत बराच वेळ शूटिंग केल्यानंतर आणि उभे राहिल्यानंतर मला हे आसन केल्याने आराम मिळतो.

या योग दिनाच्या निमित्ताने मी म्हणेन की प्रत्येकाने स्वत:साठी आणि आरोग्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. कारण दररोज योगा केल्याने स्वतःला निरोगी आणि चांगले ठेवता येते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news