Madhavi Nimkar
Madhavi Nimkar

Madhavi Nimkar : गुलाबी परी ?❤️; माधवीचं साडी कलेक्शन अफलातून

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'सुखं म्हणजे नक्की काय असतं!' ही मालिका चाहत्याच्या घराघरांत पोहोचली आहे. या मालिकेतील जयदीप आणि गौरीच्या जोडीने अल्पावधीतच चाहत्यांनी मने जिंकली आहेत. मालिकेतील खास पात्र आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे ते म्हणजे, शालिनी वहिनी.  ही भूमिका मराठी अभिनेत्री माधवी निमकरने अत्यत प्रभावीपणे साकारली आहे. माधवी ( Madhavi Nimkar ) सतत नवनवीन मराठमोळ्या लूकमधील फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या साडी कलेक्शनमधील काही नव्याने फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातलाय.

अभिनेत्री माधवी निमकरने ( Madhavi Nimkar ) तिच्या इन्स्टाग्रामवर काही सहावारी साडीतील फोटोज शेअर केले आहेत. यात माधवी जांभळा रंगाच्या साडीसोबत व्हाईट रंगाचे सिव्हलेस ब्लॉऊज परिधान करून चारचाँद लावले आहेत. यात सिल्क मोकळ्या केसांची स्टाईल, कानात इअररिंग्स, गळ्यात नेकलेस, कपाळावर टिकली, हातात अंगठी आणि घड्याळ आणि मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केलाय. सहावारी कॉटन सिल्क जांभळ्या साडीत माधवी किलर पोझ दिली असून ती मनमोहक दिसतेय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सत्यापित 'Wrapped by @mysilklove ?❤️,Thank you for this wonderful saree ?? .' असे लिहिले आहे. माधवीने फोटोला पोझ देताना कधी सोफ्यावर बसून तर कधी खिडकीच्या शेजारी उभारून दिली आहे.

याशिवाय माधवीकडेच्या अनेक नवनवीन साड्यांचे कलेक्शन तिच्या इंन्स्टाग्रामवर पाहायला मिळतेय. यात माधवीने ग्रीन, लाल, मुरूम, आकाशी, येलो, ब्ल्यू अशा वेगवेगळ्या रंगाचे कलेक्शन तिच्याकडे आहे. यातील खास म्हणजे, माधवीची आकाशी रंगाच्या नऊवारी साडीत दिलखेचक अदा पाहायला मिळाली. यावेळी तिने छोट्या पडद्यावर लावणीचा टेका धरला होता. माधवीच्या प्रत्येक फोटोवर लाईक्स आणि कॉमेन्टचा पाऊस पडला आहे.

माधवीच्या जांभल्या कलरच्या साडीवर चाहत्यांनी तिचे भरभरून कौतुक करत कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे. यात एका युजर्सने 'तुझी फिटनेस खुप तु खुप छान ठेवते खरच great….??', 'Very beautiful saree ??', 'gorgeous ??', 'Super????', 'Ekdum kadak ??????', 'Stunning', 'अप्रतिम सौंदर्य ❤️❤️', 'Nice ❤️❤️', 'Waawww ??', 'Gulabooo', 'So so gorgeous queen ❤️❤️❤️❤️ love you Madhavi ????', 'Beautiful as always ??', 'So cute ❤️❤️', 'सुंदर ❤️?', 'काय साड़ी, काय केसं; एकदम ओके आहे', 'Always fev❤️?', 'खुप छान दिसतीय साडी ❤️❤️❤️???? beautiful ♥️?, गुलाबी परी ?❤️', यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी खूपसाऱ्या हार्ट आणि फायरचा ईमोजी शेअर करून प्रतिक्रिया दिली आहे. या फोटोला आतापर्यत ८ हजांराहून अधिक जणांनी लाईक्सस केले आहे.

माधवी निमकर नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. माधवीची 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) ही मालिका गाजत आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news