पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठी सीझन ४ च्या घरामधून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेत कोणते सदस्य नॉमिनेट होणार हे आजच्या भागात कळेलच. पण आज घरामध्ये सदस्यांना गमवाव्या लागणार आहेत त्यांच्या काही मौल्यवान वस्तू. कारण घरात रंगणार आहे "सोसल तितकंच सोशल" – साप्ताहिक कार्य ! या टास्कमध्ये सदस्यांची कसोटी लागते कारण पणाला लागतात त्यांच्या काही महत्वाच्या गोष्टी. आता टीम्स सदस्यांना कोणत्या गोष्टींचे बलिदान द्यायला सांगणार हे आजच्या भागामध्ये कळेलच. पण सदस्य ते करण्यास तयार होतील का? हा देखील मोठा प्रश्न आहे. #CHALLENGE सदस्य कसे पूर्ण करतील ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. (बिग बॉस मराठी – 4)