Sajid Khan : काम देण्याच्या बहाण्याने लैंगिक शोषण, मराठी अभिनेत्रीने केले गंभीर आरोप

sajid khan
sajid khan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस १६ चा स्पर्धक आणि चित्रपट स्पर्धक साजिद खानवर अनेक आरोप झाले आहेत. मीटू मोहिमेंतर्गत अनेक महिलांनी त्याच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाले आहेत. आता मराठी अभिनेत्री जयश्री गायकवाडने (Sajid Khan) एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यामध्ये साजिद खानने कशाप्रकारे आपल्याशी वर्तवणूक केली, याबाबत सांगितले आहे. आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Sajid Khan)

मराठी अभिनेत्री जयश्री गायकवाड

'हाऊसफुल' आणि 'हे बेबी' सारखे चित्रपट आणणारे बॉलीवूड डायरेक्टर साजिद खान सध्या बिग बॉस १६ मध्ये आहे. तो स्पर्धक म्हणून गेम खेळत आहे. त्याची शोमध्ये एन्ट्री झाल्यानंतर अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते. MeToo चा आरोपी म्हणत शर्लिन चोप्राने त्याच्यावर टीकादेखील केली होती. त्याला शोतून बाहेर काढावं, असंदेखील म्हटलं होतं.

दरम्यान, मराठी अभिनेत्री जयश्री गायकवाड (Jayshree Gaikwad) ने साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. जयश्रीने एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे, 'आठ वर्षांपूर्वी एक कास्टिंग डायरेक्टर मला एका पार्टीत घेऊन गेले होते. तेथे मला साजिद खानशी भेट घडवून दिली. मी साजिद खानशी भेटून खूप खुश झाले होते. साजिद खानने मला दुसऱ्या दिवशी आपल्या ऑफिसला बोलावलं. तो म्हणाला की, तो एक चित्रपट बनवत आहे. आणि कदाचित तिच्यासाठी एखादी भूमिका मिळेल. मी त्याच्या ऑफिसला गेल्यानंतर तो मला स्पर्श करू लागला आणि अश्लील कमेंट करू लागला.'

जयश्री गायकवाड म्हणाली की, 'साजिद (Sajid Khan) ने तिला सांगितलं की, तू खूप सुंदर आहेस. पण, तिला काम का द्यावं? मग, मी त्याला विचारलं की, तुम्हा काय हवंय सर. मी चांगला अभिनय करु शकत. मग, तो म्हणाला, फक्त अभिनयाने काम चालत नाही. जे मी बोलेन, जे मी सांगेन, ते तुला करावं लागेल. मला खूप राग आला. त्यावेळी मला असं वाटत होतं की, त्याचा मर्डर करावा. मग, तेथून मी बाहेर पडलो.'

साजिद खानवर गंभीर आरोप

साजिद खानवर त्याची एक्स असिस्टेंट सलोनी चोप्रानेदेखील गंभीर आरोप केले होते. याशिवाय जर्नलिस्ट करिश्मा उपाध्यायनेदेखील अश्लील गोष्टी करणे आणि गैरवर्तणूक करण्याचा आरोप केला होता. डिंपल पॉल, अभिनेत्री आहना कुमरा, अभिनेत्री मंदाना करीमी, अभिनेत्री-मॉडल शर्लिन चोप्रा, दिवंगत अभिनेत्री जिया खान आणि अभिनेत्री सिमरन सूरीनेदेखील त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news