ट्विटरला रामराम करत अनेकांचा Mastodon वर ‘घरोबा’

ट्विटरला रामराम करत अनेक जण Mastodon वर
ट्विटरला रामराम करत अनेक जण Mastodon वर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन – एलन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. शिवाय ब्लू टिकसाठी महिन्याला ८ डॉलर इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. या सगळ्या घडामोडीत ट्विटरचे युजर्स कमी होत असून, अनेकांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. Mastodon हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरला पर्याय म्हणून पाहिला जात असून, एक आठवड्यात Mastodonचे २ लाख ३० हजार इतके फॉलोअर्स वाढले आहेत.

Mastodon हा ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे. मायक्रोब्लॉगिंग साईट असल्याने बरेच फिचर्स हे ट्विटरसारखेच आहेत. Mastodonचे काम विकेंद्रित पद्धतीने चालते आणि युजर्सनी मॅनेज केलेले सर्व्हर यासाठी कार्यरत आहेत. सर्व्हर याचा अर्थ कम्युनिट असा आहे.

Mastodonवर जॉईन होताना आपल्याला कोणत्या कम्युनिटत जॉईन व्हायचे ठरवावे लागते. उदाहरणात Mastodonवर जनरल कॅटग्री निवडली तर यात इंग्रजी भाषिक कम्युनिट आहे. त्या-त्या कम्युनिटीची माहिती देण्यात आलेली असते, त्यामुळे संबंधित कम्युनिटीत कोणत्या विषयांवर संवाद होतो ते समजते.

असे वापरावे Mastodon

युजर्स दुसऱ्या कम्युनिटीत (सर्व्हर) जाऊ शकतात. त्यासाठी सेटिंगमध्ये बदल करावे लागतात. एखाद्या कम्युनिटीत किती युजर्स आहेत हे कळू शकते.  Mastodon वापरण्यासाठी ॲप डाऊनलोड करावे लागते. त्यानंतर गेट स्टार्टेडचा संदेश येतो. तेथून स्वतःचा आयडी बनवायचा.  Mastodonवर शेअर केलेला पोस्टला toots म्हटले जाते. पोस्टची शब्द मर्यादा ५००० इतकी आहे.   Mastodon जाहिराती नाहीत. शिवाय बरेच सर्व्हर फ्री आहेत, काही सर्व्हरवर मात्र डोनेशनची मागणी केली जाते.

हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news