Manoj Jarange Patil | ‘लोकांचे पैसे खाऊन पाच-पाच वर्षे जेलमध्ये जाऊन बसता…’ जरांगे पाटलांचे छगन भुजबळांना सडेतोड उत्तर

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सासरा, जावई काढायचा प्रश्नच नाही. मराठ्यांच्या शेपट्यावर पाय ठेवल्यावर काय होतं ते आता पाहा. वयाचे भान ठेवून बोला, तुम्ही वयाने मोठे आहात. शांत न राहिल्यास तुमचाही बायोडेटा आमच्याकडे असल्याचे सडेतोड उत्तर मनोज जरांगे-पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेला दिले आहे.  सांगली येथील मराठा आरक्षण सभेनंतर ते आज (दि.१७) माध्यमांशी बोलत होते. (Manoj Jarange Patil )

पुढे जरांगे-पाटील म्हणाले, लोकांचे पैसे खाता आणि पाच-पाच वर्षे जेलमध्ये जाऊन बसता. मग तुम्हाला कोण शेंदूर लावेल? असा प्रश्न उपस्थित करत, आम्हाला ओबीसी प्रवर्गतून आरक्षण पाहिजेच. ते आम्ही मिळवणारच अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली. (Manoj Jarange Patil )

Manoj Jarange Patil: सरकारने त्यांच्यावर लक्ष ठेवावे

तुमच्या शेपटावर आम्ही पाय देत नाही. तुम्ही आमच्या पायात पाय घालू नका. तुम्ही काहीही बोला आमची पातळी आम्ही घसरु देणार नाही, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. यांना महाराष्ट्र अशांत करायचा आहे. म्हणून ते लोकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करतायत. सरकारने त्यांच्यावर लक्ष ठेवावे, अशी सूचना देखील मनोज जरांगे- पाटील यांनी सरकारला केली आहे.

आम्ही थांबणार नाही, घाबरणार नाही

यांना सत्ताधाऱ्यांनी उभा केलं आहे. काल ओबीसींनी माझं जेसीबी लावून स्वागत केलं. त्यांना काय माहीत मी किती शिकलो. त्यांच वय झालं आहे. त्या पद्धतीने ते बोलत आहेत. आम्ही थांबणार नाही, घाबरणार नाही, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना उत्तर देताना म्हटले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news