Manipur Violence: मणिपूरमध्‍ये अडकलेल्या महाराष्‍ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी विशेष विमान पाठवणार; ‘सीएमओ’ची माहिती

file photo
file photo

पुढारी ऑनलाईन : मणिपूरमध्‍ये मागील आठवड्यात भडकलेल्‍या हिंसाचारातील बळींची संख्‍या ५४वर पाेहचली आहे. राज्‍यातील परिस्थिती गंभीर आहे. मणिपूरमध्‍ये महाराष्ट्रातील २२ विद्यार्थी अडकली असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने (Manipur Violence) ट्विटरवरून दिली आहे.

या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकारने पाऊले उचलली असून, मणिपूरमध्ये अडकलेल्या(Manipur Violence) या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरच हे विमान विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडेलवरून देण्‍यात आली आहे.

सीएमओच्या ट्विटरवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे अनेक विद्यार्थी मणिपूरच्या (Manipur Violence) एनआयटी, आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहेत. येथील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधला असून, त्यांना सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी देखील मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क साधला असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती केली आहे. राज्य शासन मणिपूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना लवकरात लवकर परत आणण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news