Israel Palestine Conflict : …म्हणून आम्ही इस्रायलवर हल्ला केला; हमासने जाहीर केली भूमिका

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्क : हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायल आणि हमास असा संघर्ष उफाळला आहे. यावरून मध्य-पूर्वेवर युद्धाचे सावट आहे. या संपूर्ण घटनाक्रमात हमासने प्रथमच संघटनेची भूमिका मांडलेली आहे. इस्रायलला अवमानित करणे आणि पॅलेस्टाईनचा मुद्दा चर्चेत आणणे हाच आमचा उद्देश होतो, आणि आम्ही यात यशस्वी झालो आहोत, असे हमासच्या प्रमुखाने अरब टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

हमासचा नेता गाझी अहमद याने या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. तो म्हणाला, "आर्थिक फायद्यासाठी ज्यांना इस्रायल आणि पॅलेस्टाईन संबंध सुधारायचे आहेत, त्यांना धडा शिकवायचा होता. आम्हाला इस्रायलला अपमानित करायचे होते, ते आम्ही करून दाखवले." युनायटेड नेशन्सही आता याची दखल घेतली आणि इस्रायलच्या बेकायदेशीर ताब्यामुळे आमचा छळ होत आहे, असे त्याने सांगितले. ७ ऑक्टोबरचा हल्ला आणि इस्रायलच्या सैनिकांविरोधात होता, आम्हाला नागरिकांवर हल्ले करायचे नव्हते, असेही त्याने सांगितले. News18 या वेबसाईटने ही बातमी दिली आहे.

हमासने मांडलेले तीन मुद्दे | Israel Palestine Conflict

  • इस्रायलने पॅलेस्टाईनच्या भूमीवर बेकादेशीर ताबा मिळवला आहे, त्या विरोधात हा हल्ला होता. आम्हाला सैनिकांना किडनॅप करून, लष्करी व्यवस्था मोडकळीस आणायची होती, असे तो म्हणाला.
  • आमची क्षमता दाखवून द्यायची होती. फक्त सहा मिनिटांत आम्ही सगळ्या गोष्टींचा ताबा घेतला. इलेक्ट्रॉनिक सुरक्षा व्यवस्था मोडकळीस आली आहे. इस्रायलचे त्यांच्या सुरक्षेबद्दलचे सगळे दावे मोडून पडले, असेही तो म्हणाला.
  • पॅलेस्टाईनचा मुद्दा पुन्हा जगासमोर चर्चेला आला आहे. एकत्र येऊन लढण्याची जबाबदारी आता सगळ्या अरब राष्ट्रांची आहे. मुस्लिम ब्रदरहूड एकत्र लढत आहे. इस्रायल आपले संरक्षण करेल असे ज्यांना-ज्यांना वाटते, त्या सर्वांना हा धडा आहे.

इस्रायल आणि हमास यांच्या संघर्षात आतापर्यंत इस्रायलच्या १४०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर पॅलेस्टाईनमधील ७,३०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news