Shweta Rajan : बाई गं, श्वेताच्या निळ्या साडीत नखरेल अदा, ब्लाऊज तर..

shweta rajan
shweta rajan

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'मन झालं बाजिंद' या मालिकेतून प्रेक्षकांना वेड लावणारी कृष्णा म्हणजेच अभिनेत्री श्वेता राजन खरात (Shweta Rajan) ही सध्या चर्चेत आलीय. या मालिकेत कृष्णा खूप साधी सरळ दाखवण्यात आलीय. पण, तिचं सौंदर्य अफलातून आहे. मालिकेतील कृष्णा जरी खूप साधी असली तरी खऱ्या आयुष्यातील श्वेता खरात खूपच स्टायलिश आहे. तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटो आणि व्हिडिओ पाहून ती ग्लॅमरस असल्याचे दिसते. तिने सध्या काही फोटोज आणि व्हिडिओज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने सुंदर निळ्या रंगाची साडी परिधान केलीय.

सध्या तिचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुंदर साडीतील नखरेल अंदाजातही तिने व्हिडिओ केला आहे. निळ्या रंगाची पैठणी साडी, गुलाबी ब्लाऊज, नाकात नथ, साजेशी ज्वेलरी आणि कपाळावर टिकली असा शृंगार करत श्वेताने आपले काळेभोर लांबलचक केस मोकळे सोडले आहेत. या व्हिडिओला तिने Okay last one in this saree?? अशीही कॅप्शन लिहिलीय.
दुसऱ्या फोटोंमध्ये तिने पदरावरील मोर दाखवतानाचा फोटो क्लिक केला आहे. आणखी एका व्हिडिओमध्ये तिने ब्लाऊजची नॉट सोडताना दिसते. या व्हिडिओला तिने Bai gaaa ? अशी कॅप्शन लिहिलीय. आणखी एका फोटोला तिने पैठणीइतकं सुंदर काहीच नाही ? अशी कॅप्शन दिलेली दिसते.

दरम्यान, लागीरं झालं जी फेम नितीश चव्हाण आणि श्वेता हे कपल सोशल मीडियावर फार ॲक्टिव्ह असतात. दोघे एकमेकांसोबतचे डान्स व्हिडिओ पोस्ट करत असतात. त्यामुळे नितीश आणि श्वेता रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातं. दोघेही आपण चांगले मित्र असल्याचं सांगतात.

हेदेखील वाचा-

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news