संसद परिसरातील महापुरूषांचे पुतळे पूर्ववत स्थापित करा : मल्लिकार्जून खर्गे

संसद परिसरातील महापुरूषांचे पुतळे पूर्ववत स्थापित करा : मल्लिकार्जून खर्गे
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : संसद परिसरातील महापुरुषांचे हटविण्यात आलेले पुतळे पुन्हा त्याच जागांवर स्थापित करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींना पत्र लिहिले आहे.

महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह इतर महापुरुषांचे पुतळे आधीच्या जागेवरून उचलून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित करण्यात आले होते. पुतळे स्थानांतरित केल्याने लोकशाहीच्या मूळ भावनेचे उल्लघंन झाले असून हा महापुरुषांचा अवमान असल्याचे खर्गे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news