Priyank Kharge : काँग्रेस अध्‍यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांना मंत्रिपद

Priyank Kharge : काँग्रेस अध्‍यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांना मंत्रिपद
Published on
Updated on

बंगळूर, पुढारी वृत्तसेवा : येथील कंठिरवा स्टेडियमवर (kanteerava stadium) कर्नाटकाचे ३२ वे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि उपमुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) यांनी शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्या सोबत ८ आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. यामध्ये कॉंग्रेसचे राष्‍ट्रीय अध्यक्ष  मल्लिकार्जून खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांचाही समावेश आहे.

Priyank Kharge : हे आहेत आठ कॅबिनेट मंत्री

सिद्धरामय्यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळात जी. परमेश्वर, केएच मुनियप्पा, एम.बी.पाटील, केजी जॉर्ज, सतीश जारकीहोळी, प्रियांक खर्गे, रामलिंगा रेड्डी आणि बीझेड जमीर अहमद खान यांनी कॅबिनेट मंत्रीपदी शपथ घेतली आहे.

शपथविधी काँग्रेसच्या नेत्यांचा असला तरी या सोहळ्याला काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सपासून तामिळनाडूमधील द्रमुक पक्षापर्यंत भाजपेतर सार्‍याच पक्षांचे नेते उपस्थित राहिले. हा शपथविधी म्हणजे भाजपविरोधी पक्षांचे शक्तीप्रदर्शन आणि पुढच्या वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा काँग्रेस आघाडीचा बिगुलच मानला जात आहे.

एकप्रकारे हे भाजपविरोधी शक्तिप्रदर्शनच

काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी-वाड्रा यांच्यासह माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग, जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुला, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे प्रतिनिधी यांच्यासह यूपीए मित्र पक्षांचे वरिष्ठ नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले आहेत. त्यामुळे एकप्रकारे हे भाजपविरोधी शक्तिप्रदर्शनच असल्याचे राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news