पुढारी ऑनलाईन डेस्क : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रांचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर एखच चर्चा होत आहे. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले असून राजकिय वर्तुळात याची चर्चा होत आहे. (Mahua Moitra ) महुआ यांचे हे फोटो पार्टीतले दिसत आहेत. फोटोमध्ये शशी थरुर देखील दिसत आहेत. हॉटेलमध्ये आयोजित पार्टीतील हे फोटो व्हायरल झाल्यानंतर महुआ यांनी ट्रोलर्सवर आरोप केले आहेत. भाजपच्या ट्रोलर्सने हे फोटो व्हायरल केल्याचा दावा त्यांनी केला आहे. (Mahua Moitra )
संबंधित बातम्या-
या फोटोंमध्ये काँग्रेसचे राज्यसभा खासदार शशी थरूर आणि महुओ दिसत आहेत. बहुधा ते डिनर पार्टीतील फोटो असावेत, असा अंदाज लावला जात आहे. पण फोटो कधीचे आणि कोणत्या ठिकाणचे आहेत, याबाबत माहिती मिळालेली नाही. एका फोटमध्ये महुओ सिगारेट ओढत असल्याचे दिसत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये त्यांच्या हातात मद्याचा काचेचा ग्लास दिसत आहे. त्या फोटोसाठी पोज देत असल्याचे या फोटोमध्ये दिसतय.
ट्रोलर्सकडून फोटो व्हायरल केल्याचा दावा
हे फोटो व्हायरल झाल्यानंतर महुआ यांनी एक्सवर ट्विट करून म्हटले आहे. – भाजपच्या ट्रोलर्सकडून माझे वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात असल्याचे पाहून मला आश्चर्य वाटत आहे.
पुढे त्यांनी म्हटलंय – तुम्ही माझा फोटो क्रॉप का केलात? मला पांढऱ्या ब्लाऊजपेक्षा हिरव्या रंगाचे कपडे अधिक आवडतात. त्या डिनरसाठी उपस्थित असणाऱ्या इतर मान्यवरांचेही फोटो दाखवा. बंगाली महिला आयुष्य जगतात, हे असत्य नाही. आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय- मला सिगारेटची ॲलर्जी आहे. मी धुम्रपान करत नाही. केवळ फोटोसाठी पोझ देण्यासाठी मी हातात सिगारेट धरलीय.