मुंबई : दसरा मेळाव्यांच्या निमित्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटांचे शक्तिप्रदर्शन आज (दि.२४) होत आहे. शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर, तर ठाकरे गटाचा मेळावा शिवतीर्थावर होत आहे. या मेळाव्यांतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकमेकांवर काय हल्ले चढवतात व लोकसभा निवडणुकीबाबत काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)
दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिंदे गट आणि ठाकरे गटाने टीझरच्या माध्यमातून एकमेकांवर शरसंधान साधले. शिवतीर्थावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस त्यांच्या टीकेचे लक्ष्य असतील. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे यांच्यावर आणखी घणाघाती हल्ला चढवतील, असे बोलले जात आहे.
हेही वाचा