पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रविवारी भूकंप झाल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांचे आज (बुधवार) मुंबईत शक्तिप्रदर्शन होत असून, शरद पवार आणि अजित पवार यांनी त्यासाठी बैठका बोलावल्या आहेत. आजच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून सर्व आमदारांना 'व्हिप' बजावला आहे. त्यामुळे आमदारांची कोंडी झाली आहे. दरम्यान, आजच्या बैठकीतून काका – पुतण्याच्या गटात नक्की कीती आमदार आहेत हे स्पष्ट होणार आहे.
सकाळी ११ वाजता अजित पवार यांची तर दुपारी १ वाजता शरद पवार यांची बैठक होणार आहे. राष्ट्रवादीच्या 'दोन' बैठकांमुळे राज्यभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही गटांना किती आमदारांचा पाठिंबा आहे हे आजच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार असल्याने सर्वांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी बोलावलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीपूर्वी अजित पवार यांच्या समर्थकांनी त्यांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतली.
हेही वाचा :