Maharashtra Politics: २०२४ ची निवडणूक मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली;मंत्री सुधीर मुनगंटीवार

Maharashtra Politics
Maharashtra Politics

पुढारी ऑनलाईन डेस्क: बारामती तालुक्यातील काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकप्रसंगी अजित पवार गटाने पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. यावरून हे आरोप हे हरण्याच्या भिततीतून केले जात आहेत. विरोधकांच्या टीका निर्थक आहेत. हरणारा कायम विरोधी पक्षावर टीका करत असतो. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकास सुरू आहे. दरम्यान २०२४ ची निवडणुक ही मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. ते आज (दि.५) माध्यमांशी संवाद साधत होते. (Maharashtra Politics)

पुढे बोलताना मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मतदारांना पैसे दिल्याचे म्हणणं म्हणजे मतदारांचा अपमान आहे. पुरोगामी महाराष्ट्रात जातींमध्ये भेदभाव नको. जातीचं राजकारण कोणीही करू नये. तसेच राज्यातील जाती जातीमधील भेदभाव दूर करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे देखील मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Politics)

मराठा आरक्षणाबाबात सरकार सकारात्मक आहे. मराठा आरक्षण देण्याबाबत सर्वाचं एकमत आहे. त्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नी सरकार तोडगा करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचेही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. (Maharashtra Politics)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news