विधान परिषद निवडणूक : गोंधळ नको म्हणून मतदान लवकर उरकून घेण्याची भाजपची रणनीती (व्हिडिओ)

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; राज्यसभा निवडणुकीमध्ये मतदान करताना आक्षेपांचे राजकारण रंगले होते. या निवडणुकीमध्ये असा प्रसंग येऊ नये म्हणून भाजपने सुरुवातीलाच आपले मतदान उरकून घेण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या मतदानामध्ये भाजपचे आमदार सर्वाधिक आहेत.

राज्यसभा निवडणुकीत मतदानाच्या शेवटी भाजपने मंत्री जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि आमदार सुहास कांदे यांनी अधिकृत प्रतिनिधीपेक्षा अन्य लोकांना मतदान दाखवून केल्याचा आक्षेप घेतला होता. तर महाविकास आघाडीने भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष रवी राणा यांच्या मताबद्दल तक्रार केली होती. आक्षेपांचे हे राजकारण चांगलेच रंगले आणि हा पेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला होता. अखेर त्यामध्ये शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे एक मत बाद झाले होते. असा प्रसंग टाळण्यासाठी भाजपने आपल्या आमदारांना सुरुवातीलाच मतदान करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आमदार मतदानाला जाताना देवेंद्र फडणवीस हे स्वतः मतदानाबाबत आणि पसंतीक्रमबाबत सूचना देत आहेत.

पहा व्हिडिओ : विधान परिषद निवडणूक : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमदारांना मतदानाबाबत पसंतीक्रम समजावून सांगताना….

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news