Nanded Hospital Death | नांदेड मृत्यू प्रकरणी ‘आरोग्या’चे धिंडवडे; ३५% जागा रिक्त असल्याची सरकारची कबुली

Nanded Hospital Death | नांदेड मृत्यू प्रकरणी ‘आरोग्या’चे धिंडवडे; ३५% जागा रिक्त असल्याची सरकारची कबुली

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याच्या आरोग्य विभागातील मंजुर जागांपैकी ३५ टक्के जागा रिक्त असल्याचे प्रतिज्ञापत्र सरकारने उच्च न्यायालयात सादर केले आहे. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणाची उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. या याचिकवर सरकारने मंगळवारी प्रतिज्ञापत्र सादर केले. (Nanded Hospital Death)

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहसचिवांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले. राज्यात ५७,७१४ इतक्या जागा रिक्त आहेत, त्यातील ३७,३१२ जागा भरल्या असून २०,४०२ जागा रिक्त आहेत अशा माहिती या प्रतिज्ञापत्रातून दिली आहे.

मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अरिफ डॉक्टर यांच्या समोर ही सुनावणी सुरू आहे. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूंबद्दल एका वकिलाने पत्र लिहिले होते. त्यावर उच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणात जनहितार्थ याचिका दाखल करून घेतली आहे. प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे, "५,४११ जागा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच स्पेशॅलिस्ट डॉक्टरांच्या ९५१ जागा भरल्या जाणार आहेत." (Nanded Hospital Death)

याशिवाय वैद्यकीय शिक्षण आणि औषधे विभागातील ३९७४ जागा रिक्त आहेत. या विभागातील एकूण जागा ५,५६९ इतक्या जागा मंजुर आहेत. याशिवाय औषधे खरेदीसाठी 174,40,02,000 इतकी रक्कम मंजुर झाल्याचेही यात म्हटले आहे. याशिवाय सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर 22,95,74,000 इतकी रक्कम खर्च केल्याचेही यात म्हटले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news