Maharashtra budget 2023 : कृषीमंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर ‘मविआ’चे आमदार आक्रमक

Maharashtra budget 2023 : कृषीमंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर ‘मविआ’चे आमदार आक्रमक
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा :  शेतकऱ्यांनी जीवन संपवले या गोष्टीची टिंगल करणार्‍या कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… धिक्कार असो, धिक्कार असो कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो…,या कृषी मंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय…, निवडणूकीचा गाजर हलवा… महाराष्ट्राचे बजेट, गाजर हलवा…,खोके सरकार हाय हाय… ,५०० कोटीचा घोटाळा करणार्‍या आमदार राहुल कुलवर कारवाई झालीच पाहिजे…,सट्टा लावतो म्हणणार्‍या मंत्र्यांचा धिक्कार असो… अशा गगनभेदी घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला. (Maharashtra budget 2023)

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा नववा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदेसरकारच्या विरोधात आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news