Maharashtra Budget 2023-2024 | शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी १० हजार रुपयांची वाढ

Maharashtra Budget 2023-2024 | शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी १० हजार रुपयांची वाढ
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३-२४ या वर्षाचा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना अनेक नवीन योजनांची घोषणा केली. यामध्ये शिक्षण सेवकांच्या मानधनात भरघोस वाढ केली आहे. यामध्ये सरासरी १० हजारांची वाढ करण्यात आल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. अमृतकाळातील असलेला हा पहिला अर्थसंकल्प असून यात शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा, पर्यावरणपूरक विकास याचा समावेश असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. Maharashtra Budget 2023-2024

दरम्यान, शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करताना, प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक यांना ६ हजारवरुन १६ हजार रुपये, माध्यमिक शिक्षण सेवक यांना ८ हजारवरुन १८ हजार रुपये तर उच्च माध्यमिक शिक्षण सेवक यांना ९ हजारवरुन २० हजार रुपये अशी वाढ करण्यात आली आहे. Maharashtra Budget 2023-2024

अर्थसंकल्पात असंघटित क्षेत्रातील तीन कोटीहून अधिक कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात येणार असल्याचेही सांगितले. Maharashtra Budget 2023-2024

दरम्यान, राष्ट्राची प्रगती ही महिला सक्षमीकरणाच्या आधारे ठरवली जाते. यासाठी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लेक-लाडकी' योजनेची घोषणा अर्थसंकल्पातून केली केली. या योजनेंर्गत  पिवळ्या व केशरी रेशन कार्ड कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर ५००० रुपये, इयत्ता चौथी ४००० रुपये, सहावीत गेल्यावर सहा हजार रुपये आणि अकरावीत आठ हजार रुपये अनुदान दिले जाईल. लाभार्थी मुलीचे वय १८ जागा पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये दिले जातील. Maharashtra Budget 2023-2024

हे वचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news