Mahaparinirvan Diwas 2023 : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 

Mahaparinirvan Diwas 2023 : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा :  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.   (Mahaparinirvan Diwas 2023 )

दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर, सदा सरवणकर, कालिदास कोळंबकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर, माजी खासदार नरेंद्र जाधव, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, भिक्खू महासंघाचे अध्यक्ष डॉ. भदन्त राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागामार्फत आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुंबई महापालिकेतर्फे प्रकाशित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पाऊलखुणा' ही माहिती पुस्तिका मान्यवरांना भेट देण्यात आली.

Mahaparinirvan Diwas 2023 : हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया पोस्ट करत म्हटलं आहे की,"भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि आधुनिक भारताचे निर्माते, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्रतापूर्वक अभिवादन"उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोस्ट करत म्हटलं आहे की,"संविधानाची मांडणी करून मानवी मूल्यांची पायाभरणी करणारे, लोकशाही बळकट करणारे आधुनिक भारताचे शिल्पकार, थोर समाजसुधारक आणि विचारवंत, बोधिसत्व, ज्ञानसूर्य, क्रांतिसूर्य, महामानव, युगपुरुष, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं कृतज्ञतापूर्वक वंदन करतो. बाबासाहेबांनी दिलेली एकतेची, समतेची, बंधुत्वाची, न्यायाची शिकवण आपण सारेच जोपासुया, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news