मद्रास : कोर्टाच्या इतिहासात पहिल्यांदाच व्हाॅट्स ॲपद्वारे घेतली सुनावणी; जाणून घ्या केस

मद्रास : कोर्टाच्या इतिहासात पहिल्यांदाच व्हाॅट्स ॲपद्वारे घेतली सुनावणी; जाणून घ्या केस
Published on
Updated on

चेन्नई, पुढारी ऑनलाईन : न्यायालयाच्या इतिहासात सकारात्मक नोंद घेण्यासारखी सुनावणी मद्रास उच्च न्यायालयाने घेतली आहे. मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुट्टीच्या दिवशी अर्थात रविवारी एका विवाह समारंभानिमित्त गेले होते. ते शहराच्या बाहेर नागरकोलईमध्ये होते. सोमवारी जर रथयात्रा झाली नाही; तर दैवी प्रकोप होईल. त्यामुळे तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती. त्यामुळे रविवारी कोर्टाने पहिल्यांदाच व्हाॅट्स ॲप काॅलिंगद्वारे सुनावणी केली.

न्यायाधीश जी. आर. स्वामीनाथन रविवारी एका विवाह समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यानिमित्ताने ते शहराबाहेर असणाऱ्या नागरकोलई होते. यावेळी त्यांनी व्हाॅट्स ॲप काॅलिंगद्वारे सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला. या सुनावणीमध्ये श्री अभीष्ट वरदराजा स्वामी मंदिराच्या वंशानुगत ट्रस्टी पी. आर. श्रीनिवासन यांनी दावा केला होता की, "सोमवारी त्यांच्या गावात प्रस्तावित रथयात्रा आयोजित करण्यात आली नाही, तर संपूर्ण गावाला दैवी प्रकोपाचा सामना करावा लागेल."

या प्रकरणावर आदेश देताना कोर्ट म्हणाले की, "रिट याचिकाकर्त्याच्या मागणीमुळे नागरकोलईमध्ये आणीबाणीच्या परिस्थिती अशी सुनावणी करावी लागत आहे. त्यामुळे व्हाॅट्स ॲपवर व्हिडीओ काॅलिंगद्वारे ही सुनावणी करण्यात येणार आहे." याचिककर्त्याचे वकील व्ही. राघवाचारी एका ठिकाणी बसले होते, तर साॅलिसीटर जनरल आर. षणमुगसुंदरम दुसऱ्या ठिकाणी होते. वेगवेगळ्या ठिकाणांवरून ही सुनावणी सुरू होती.

 ही याचिका धर्मपुरी जिल्ह्यातील एका मंदिरासंदर्भात हाेती. "धार्मिक आणि परमार्थ विभागाशीसंबंधित निरीक्षकांना मंदिर प्रशासन व ट्रस्टला रथयात्रा रोखण्याचा आदेश देण्याचा अधिकार नाही", असे सांगत न्यायालयाने रथयात्रा राेखण्‍याचा आदेश रद्द केला. या प्रकरणात साॅलिसीटर जनरल यांनी न्यायाधीशांना सांगितले की, "सरकारला रथ महोत्सव आयोजित करण्यापासून कोणतीच अडचण नाही. सरकारला सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची चिंता आहे. सुरक्षेसंदर्भातील मार्गदर्शक तत्वांचं पालन न केल्यामुळे तंजोर जिल्ह्यात मोठी घटना झाली होती."

न्यायाधीशांनी यावेळी स्‍पष्‍ट केली की, "रथयात्रा आयोजन दरम्यान सरकारकडून निर्धारित नियम आणि अटींचे कडक पालन करण्यात यावे. तसेच नियोजित स्थळापर्यंत रथ पोहोचेपर्यंत विद्युत वितरण कंपनीकडून वीज पुरवठा खंडीत करण्यात यावा." मागील महिन्यात तंजोरमध्ये एका मंदिराच्या शोभा यात्रेदरम्यान हायटेंशन वीजेच्या तारेशी संपर्क आल्यामुळे ११ भाविक मृत्‍यूमुखी पडले हाेते. तर १७ लोक जखमी झाले होते.

पाहा व्हिडीओ : नमाची भाकरी फुगली की फसली? पाहा, 'कोण ठरणार अस्सल सुगरणबाई' !

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news