नाशिक : माहेरुन पैसे घेऊन ये! विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने चौघांविरुद्ध गुन्हा | पुढारी

नाशिक : माहेरुन पैसे घेऊन ये! विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने चौघांविरुद्ध गुन्हा

नाशिक (सातपूर) : घर घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, या मागणीसाठी मानसिक व शारिरीक छळ केल्याने या विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्विनी मिलिंद दहिते (29, रा. जाधव संकुल, अशोकनगर) या विवाहितेने रविवारी राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून तेजस्विनीचा घर घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत यासाठी छळ सुरू होता. त्यातच तिने महिन्यांपूर्वी तिला मुलगी झाल्याने सासरच्या मंडळीचा छळ वाढला होता. त्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी सासरच्या चार जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिंद दहिते, प्रकाश दहिते, शीला दहिते व मोनाली बोरसे (रा.,सर्व मातोश्री फ्लोअर मिल जवळ, जाधव संकुल) अशी संशयितांची नावे आहेत. न्यायालयाने सासू, सासर्‍यास न्यायालयीन कोठडी तर नवर्‍यास पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक श्याम जाधव करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button