मुरैना; वृत्तसंस्था : मुरैनाच्या लेपा भिडोसा गावात शुक्रवारी एका तरुणाने एकाच कुटुंबातील सहा सदस्यांची गोळ्या घालून हत्या केली(Six of family shot dead in firing). गावातील दोन कुटुंबांमध्ये गेल्या 10 वर्षांपासून जमिनीवरून वाद होता. मृतांमध्ये 3 पुरुषांसह 3 महिलांचा समावेश आहेत. तीनजण जखमी झाले. आमदार रवींद्र सिंह यांचे हे गाव आहे. (Madhya Pradesh)
हत्याकांडाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात एक तरुण 5 जणांवर बेछूट गोळीबार करताना दिसतो. घटना घडली तेव्हा लहान मुलेही अंगणात खेळत होती. एका महिलेने सर्वांना आवाज देऊन घरात बोलावले. (Madhya Pradesh)
गावातील रणजित तोमर व राधे तोमर यांच्यात जमिनीवरून वाद सुरू होता. 2014 मध्ये रणजीत तोमर गटाने या वादातून राधे तोमरच्या कुटुंबातील 3 जणांची हत्या केली होती. (Madhya Pradesh)
रणजितच्या कुटुंबाने मग गाव सोडले होते. काही दिवसांपूर्वीच रणजित गावी परतला होता आणि हा हल्ला घडवून त्याने सूड उगविला.
डाकू पानसिंग तोमर होता याच गावचा
डाकू पानसिंग तोमर हाही याच गावचा होता. याच्या कहाणीवर बनलेल्या चित्रपटात इरफान खान मुख्य भूमिकेत होता.
या ६ जणांचा मृत्यू
लेस कुमारी वीरेंद्र सिंह तोमर, बबली नरेंद्र सिंह तोमर, मधु कुमारी सुनील तोमर या तीन महिलांसह बदलू सिंह यांचा मुलगा गजेंद्र सिंह व गजेंद्र सिंह यांच्या सत्यप्रकाश व संजू या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. जखमींत विनोद सिंह व वीरेंद्र सिह यांचा समावेश आहे.
अधिक वाचा :