पुढारी ऑनलाईन डेस्क : अलाहाबाद उच्च न्यायालयाने आदिपुरुष चित्रपटाविषयी सेन्सॉर बोर्डाकडे उत्तर मागितले आहे. आदिपुरुष या चित्रपटाचा प्रोमो प्रमाणपत्रविना रिलीज करण्यात आला होता. यावरून चित्रपटाविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाकडून विना प्रमाणपत्रासाठी चित्रपटाचा प्रोमो जारी केला होता. आता याप्रकरणी कोर्टाने सेन्सॉर बोर्डाकडून उत्तर मागितले आहे. पुढील सुनावणी २१ फेब्रुवारी रोजी होईल. (Adipurush)
दिग्दर्शक ओम राऊतचा चित्रपट आदिपुरुषवरून मोठा वाद झाला होता. आता या चित्रपटावरून अलाहाबाद हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाकडून उत्तर मागितलं आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ पीठाने सेन्सॉरला 'आदिपुरुष' विरोधात दाखर जनहित याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी नोटीस जारी केली आहे.
याचिकेत म्हटलं गेलं आहे की, चित्रपट निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र घेतल्याविना Adipurush चित्रपटाचा प्रोमो जारी केला आहे, जे नियमांचे स्पष्ट उल्लंघन आहे. याचिकेत देवी सीता यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने घातलेल्या कपड्यांवरूनही आक्षेप घेण्यात आला आहे.
याचिकेत म्हटलं आहे की, भक्तांमध्ये भगवान राम आणि देवी सीता यांच्याविषयी आस्था आहे. परंतु, चित्रपटामध्ये भक्तांच्या आस्थेविरोधात दाखवण्यात आलं आहे. याचिकेमध्ये रावणाच्या दृश्यांवरून आक्षेप घेण्यात आला आहे. याचिकेमध्ये भगवान राम, माता सीता आणि रावणाची भूमिका अनुक्रमे साऊथ अभिनेता प्रभास, कृती सेनॉन, सैफ अली खान साकारत आहे. हनुमानाची भूमिका देवदत्त नागे आणि लक्ष्मणची भूमिका सनी सिंह यांनादेखील प्रतिवादी बनवलं आहे. यानंतर चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक ओम राऊतेदखील याचिकेत प्रतिवादी आहेत.