LPG Cylinder : एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढल्याने सोशल मीडीयावर मीम्स होतायत तुफान व्हायरल

LPG Cylinder : एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढल्याने सोशल मीडीयावर मीम्स होतायत तुफान व्हायरल www.pudharinews.
LPG Cylinder : एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढल्याने सोशल मीडीयावर मीम्स होतायत तुफान व्हायरल www.pudharinews.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :काही दिवसांपूर्वीच घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमत मोठी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज (दि. १९) पुन्हा गॅस वितरण कंपनीने एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ केली आहे. या दरवाढीनंतर सोशल मीडीयावर सिलेंडरवर अनेक मीम्स बनवले जात आहेत. अनेकांनी ट्वीटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मीम्स शेअर केले आहेत. हुसेन बोल्टचा स्पर्धेत धावतानाचा फोटो घेत सिलेंडर सोबतच तेल, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कशा वाढत हे दाखवले आहे. (LPG Cylinder)

आज पुन्हा एकदा एलपीजी सिलेंडरच्या किमतीत प्रती सिलेंडर ३.५० रूपयांची वाढ करण्यात आली आहे. एलपीजी सिलेंडरच्या किमतीत या महिन्यात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत एलपीजी सिलेंडरची किंमत १,००३ रूपये इतकी झाली आहे. एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढल्यानंतर अनेक मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत. नेटकऱ्यांनी अनेक उपहासात्मक मीम्सही केले आहेत. जे सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. (LPG Cylinder)

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news