Lord Shardul Memes : शार्दुलच्या वर्चस्वावर ब्रिटनची राणी फिदा!

Lord Shardul Memes : शार्दुलच्या वर्चस्वावर ब्रिटनची राणी फिदा!
Lord Shardul Memes : शार्दुलच्या वर्चस्वावर ब्रिटनची राणी फिदा!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : lord shardul memes : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने जोहान्सबर्गमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कमाल केली. शार्दुलने दिवसाच्या पहिल्या सत्रात अवघ्या ८ धावांत ३ बळी घेतले. लॉर्ड शार्दुलने आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर, कीगन पीटरसन आणि ५० धावांचा टप्पा ओलांडलेला रायसी व्हॅन डेर ड्युसेन यांना बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ठाकूरने पीटरसनला बाद केल्यावर डगआऊटमध्ये बसलेला भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहली जो दुखापतीमुळे खेळत नव्हता तो टाळ्या वाजवण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही.

लंच ब्रेकनंतर पुन्हा एकदा शार्दुल ठाकूर द. आफ्रिकेच्या संघाला घाम फोडला. त्याने ६४.६ आणि ६६.३ व्या षटकात अनुक्रमे काइल व्हेरेने आणि टेम्बा बावुमा यांना बाद केले. व्हेरेने २१ आणि बावुमा ५१ धावा करून माघारी परतले. बावुमा हा त्याचा पाचवा बळी ठरला. शार्दुलने कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच डावात पाच विकेट्स घेतल्या. वांडरर्सवर एका डावात पाच विकेट घेणारा तो सहावा भारतीय गोलंदाज ठरला. त्याच्या आधी मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, एस. श्रीशांत, जवागल श्रीनाथ आणि अनिल कुंबळे यांनी हा पराक्रम केला आहे. (lord shardul memes)

दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत दक्षिण आफ्रिकेने १०२ धावांवर चार विकेट गमावल्या. ठाकूरने ४.५ षटकात आठ धावा देत तीन बळी घेतले. त्याने डीन एल्गर (१२० चेंडूत २८) आणि युवा कीगन पीटरसन (११८ चेंडूत ६२) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर उपाहारापूर्वी रासी व्हॅन डर दुसान (१) यांनी दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर आणले. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांचे भरभरून प्रेम पाहायला मिळाले. चाहत्यांनी सोशल मीडियावर शार्दुल ठाकूरवर मीम्सचा पाऊस पाडला. (lord shardul memes)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news