Lok Sabha Election West Bengal |ममतांना धक्का; निवडणूक आयोगाकडून पोलीस महासंचालकांची उचलबांगडी

Lok Sabha Election West Bengal
Lok Sabha Election West Bengal
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणुक आयोगाने (ECI) पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का दिला आहे. राज्याने नियुक्त केलल्या पोलीस महासंचालक विवेक सहाय यांची निवड रद्द करत, आयोगाने त्यांची उचलबांगडी केली आहे. त्यानंतर संजय मुखर्जी यांची प. बंगालचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून आयोगाने नियुक्ती केली. संजय हे १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Lok Sabha Election West Bengal)

पोलीस संचालक राजीव कुमार यांची बदली झाल्यानंतर काही तासांनंतर पश्चिम बंगाल सरकारने विवेक सहाय यांची नवीन डीजीपी म्हणून नियुक्ती केली. परंतु निवडणुक आयोगाने हस्तक्षेप करत पुन्हा संजय मुखर्जी यांची नवीन पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे. हा ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का मानला जात आहे. (Lok Sabha Election West Bengal)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news