Lok Sabha Election 2024: ममतांना धक्का; ‘तृणमूल’च्या दोन खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश | पुढारी

Lok Sabha Election 2024: ममतांना धक्का; 'तृणमूल'च्या दोन खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्क: पं. बंगालच्या मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार अर्जुन सिंह आणि दिव्येंदू अधिकारी यांनी आज (दि.१५) भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला. दिल्लीत भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेदरम्यान तृणमूलच्या या दोन्ही खासदरांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी  भाजप नेते अमित मालवीय उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होणार असून, या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींना हा मोठा धोका मानला जात आहे. (Lok Sabha Election 2024)

पं.बंगालला बदलाची गरज: भाजप नेते अमित मालवीय

या प्रसंगी भाजप नेते अमित मालवीय यांनी आज (दि.१५) भाजप पक्षात सामील झालेल्या तृणमूल खासदार अर्जुन सिंग आणि दिव्येंदू अधिकारी यांचे स्वागत केले . तसेच पं. बंगालला “बदलाची गरज आहे” यावर अधिक भर दिला. 

हे ही वाचा:

Back to top button