Lok Sabha Election 2024 : वेध लोकसभेचे; लोकसभा निवडणुकांत अनुभवले चढउतार     

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024
Published on
Updated on
वेध लोकसभेचे
१९५२ ला पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली तेव्हा मराठवाडा प्रदेश हा हैदराबाद स्टेटचा भाग होता. या निवडणुकीत अंबड, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, नांदेड,  धाराशिव (उस्मानाबाद), परभणी या सहा मतदारसंघातून सात खासदार निवडले गेले होते. त्यावेळी ८६ मतदारसंघातून दोन खासदार निवडण्यात आले होते, त्यात नांदेडचा समावेश होता. देशभरात काँग्रेस उभा करील तो उमेदवार हमखास निवडून येणार असे असताना परभणी आणि बीडमधून विरोधी पक्षाचे उमेदवार विजयी झाले. साता-याचे क्रांतिसिंह नानासाहेब पाटील हे चौथ्या लोकसभेत बीडमधून विजयी झाले होते. परभणीचे रामराव लोणीकर हे यादव नाव लावत असल्याने त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळत गेली, खिशात सात रुपये असताना जालन्यातून पुंडलिक हरी दानवे विजयी झाले, असे एक ना अनेक राजकीय किस्से. (Lok Sabha Election 2024)
(१९५२ च्या निवडणुकीत झालेल्या मतदानाचे संग्रहित छायाचित्र)
(१९५२ च्या निवडणुकीत झालेल्या मतदानाचे संग्रहित छायाचित्र)

Lok Sabha Election 2024 :  लोकसभा निवडणुकांत अनुभवले चढउतार

काँग्रेसचा प्रदीर्घ काळ गड राहिलेल्या संभाजीनगरने इंदिरा लाटेत एस काँग्रेसचे साहेबराव डोणगावकर यांना लोकसभेत पाठविले. परभणीतून अशोक देशमुख हे धनुष्यबाणावर निवडून गेल्यामुळे शिवसेनेला राष्ट्रीय पक्ष व धनुष्यबाण चिन्ह मिळाले, मशाल चिन्हावर मोरेश्वर सावे हे १९८९ ला विजयी झाले, हाजी मस्तान व  प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी स्थापन केलेल्या दलित मुस्लिम सुरक्षा मंचचा उमेदवार संभाजीनगरातून उभा होता, इचलकरंजीचे जयवंतराव आवळे हे होते लातूरचे खासदार या काही विशेष नोंदी. शंकरराव चव्हाण, शिवराज पाटील चाकूरकर, गोपीनाथराव मुंडे, रावसाहेब दानवे, सूर्यकांता पाटील, रजनी पाटील अशा दिग्गजांना मराठवाड्याने लोकसभेत संधी दिली. प्रारंभी  काँग्रेस, जनता लाटेत जनता पक्ष, इंदिरा काँग्रेस, युती झाल्यानंतर भाजप – शिवसेनेला भक्कम साथ देणारा मतदार. १९५२ पासून आतापर्यंत अनेक राजकीय घडामोडींचा साक्षीदार असणाऱ्या मराठवाड्याचे राजकारण व घडामोडी चर्चेच्या विषय राहिल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news