पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील वर्षी फुटबॉल विश्वचषकाने संपूर्ण जगात एकच नाव गाजलं ते म्हणजे लिओनेल मेस्सी. अर्जेटिना संघाला विश्वचषक जिंकून देण्याचे स्वप्न त्याने साकारले. त्याच्यासाठी कतारमध्ये झालेला विश्वचषक स्मरणीय ठरला. मात्र या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात केलेल्या कृत्याबद्दल मेस्सीने खेद व्यक्त केला आहे. ( Lionel Messi Regret )
फुटबॉल विश्वचषक स्पर्धा २०२२ कतार येथे झाली. ९ डिसेंबर २०२२ रोजी उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यासाठी अर्जेंटिना आणि नेदरलँडचे संघ आमने-सामने आले होते. या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत नेदरलँड्सच्या व्यवस्थापकाने अर्जेंटिनाबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याचा उल्लेख यामेस्सीने केला होता. पेनल्टीवर विजय मिळाल्यानंतर लिओनेल मेस्सीने नेदरलँडचे व्यवस्थापक लुई व्हॅन गाल यांच्याकडे पाहून आक्षेपार्ह हावभाव केले होते. मेस्सीची कृती अनपेक्षित आणि धक्कादायक होती. यानंतर त्यांच्यावर मोठी टीकाही झाली होती.
याबाबत पॅरिसमधील एका कार्यक्रमात बोलताना मेस्सी म्हणाला की, त्या क्षणी माझ्याकडून जी कृती झाली ती मला आवडली नाही. तो एक अस्वस्थ क्षण होता. सारं काही खूप लवकर घडलं. मला माझ्या कृती बद्दल खेद आहे.
हेही वाचा :