Tiger 3 : ‘लेके प्रभु का नाम’वर थिरकली सलमान-कॅटरिनाची जोडी (Song Teaser)

salman khan -katrina
salman khan -katrina

पुढारी ऑनलाईन डेस्क : सलमान खान आणि कॅटरिना कैफ आदित्य चोप्राच्या टायगर ३ मध्ये पुन्हा धुमाकूळ घालणार आहेत. सुपर-एजंट टायगर आणि झोयाची वायआरएफ स्पाय युनिवर्स मध्ये पुन्हा दिसणार आहेत. (Tiger 3) टायगर ३ च्या पहिल्या गाण्याच्या लेके प्रभु का नामच्या फर्स्ट लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला! फोटो मध्ये सलमान आणि कॅटरिना तुर्कीतील कॅपाडोशिया येथे एका सुंदर ठिकाणी गाण्यावर थिरकताना दिसले. YRF सोमवारी, २३ ऑक्टोबर रोजी लेके प्रभू का नाम रिलीज करणार आहे. आता या गाण्याची टीझर प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. (Tiger 3)

संबंधित बातम्या –

प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांनी गायलेल्या वाईबी डान्स ट्रॅकमध्ये सलमान आणि कॅटरिनाची अविश्वसनीय केमिस्ट्री दिसते! दोन्ही सुपरस्टार या गाण्यात अतिशय सुंदर दिसत आहेत, जे या उत्सवाच्या हंगामात नक्कीच पार्टी अँथम बनेल!
मनीश शर्मा दिग्दर्शित, टायगर ३ यावर्षी दिवाळीत, १२ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news