Elon Musk’s Twitter : ‘ब्राह्मणविरोधी’ आरोप झालेल्या अधिकाऱ्याचीही ट्विटरमधून हकालपट्टी

Elon Musk’s Twitter : ‘ब्राह्मणविरोधी’ आरोप झालेल्या अधिकाऱ्याचीही ट्विटरमधून हकालपट्टी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन – अब्जाधीश एलन मस्क (Elon Musk's Twitter) यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर सीईओ पराग अग्रवाल यांच्यासोबत कायदा आणि धोरण विभागाच्या प्रमुख विजया गाड्डे यांनाही घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. २०१८मध्ये ट्विटरचे तत्कालीन सीईओ जॅक डॉर्सी यांच्या भारत भेटीवेळी त्यांच्या हातात Smash Brahmanical patriarchy हा फलक होता. त्यावरून विजया गाड्डे यांना माफी मागावी लागली होती. तसेच अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर ट्विटरने बंदी घातली, त्या निर्णयामागे विजया गाड्डे होत्या.

२०१८मध्ये जॅक डॉर्सी भारतात आले होते. दिल्लीत एका खासगी कार्यक्रमात काही पत्रकारांशी त्यांनी चर्चा केली होती. या पत्रकारांतील एका महिला पत्रकाराने डॉर्सी यांच्या हातात Smash Brahmanical patriarchy असे लिहिलेला फलक दिला होता. डॉर्सी यांचा हा फोटो नंतर व्हायरल झाला. या कार्यक्रमात विजया गड्डेही सहभागी होत्या.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी ट्विटरवर टीका केली होती. या प्रकारानंतर विजया गाड्डे यांना माफी मागावी लागली होती.
"आम्हाला या खासगी कार्यक्रमात एक पोस्टर गिफ्ट देण्यात आले. त्याचा आम्ही फोटो घेतला. पण असे कऱण्यापूर्वी आम्ही अधिक विचार करणे आवश्यक होते. ट्विटर हा तटस्थ प्लॅटफॉर्म आहे, पण या ठिकाणी आम्ही अपयशी ठरलो. भारतातील ग्राहकांना सेवा देताना आम्ही अधिक चांगले काम केले पाहिजे," असे त्यांनी म्हटले होते. विजया गाड्डे या वकील असून मुळच्या हैदराबादच्या आहेत. (Elon Musk's Twitter)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news