Electric Vehicles : पावसाळ्यात इलेक्ट्रिक वाहनांची कशी काळजी घ्याल? ‘या’ टिप्‍स जाणून घ्‍या

Electric Vehicles : पावसाळ्यात इलेक्ट्रिक वाहनांची कशी काळजी घ्याल? ‘या’ टिप्‍स जाणून घ्‍या

पुढारी ऑनलाईन डेस्क : मान्सूनचे देशभरात सर्वत्र आगमन झाले आहे. पावसाळ्यात काही गाेष्‍टींची काळजी घेणे अधिक आवश्‍यक ठरते.गेल्या वर्षभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicles) संख्‍येत माेठी वाढ झाली आहे; पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या वाहनांची देखभाल हे वाहनधारकांसमाेर आव्‍हान असते. मुसळधार पावसाने शहरी भागांमध्ये रस्त्यासह पार्किंगमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे या दिवसांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांची खूप काळजी घ्यावी लागते. जाणून घेवूया, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची कशी काळजी घ्‍यावी याविषयी…

इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles) रस्त्यांवर तर कधी बेसमेंटला पार्किंग केली जातात. अशा ठिकाणी पाणी साचून वाहनांचे नुकसान होते. अशावेळी अशा वाहनांची देखभाल करणे हा मोठा प्रश्न अनेकांसमोर असतो. तसं पाहिले तर पावसाळ्यातही इलेक्ट्रिक वाहनांची देखभाल करणे तितकेसे अवघड नसते. तुम्‍ही ही वाहने (EV) चांगल्या स्थितीत आणि सुरक्षित ठेवू शकता. यासाठी तुम्हाला खालील चार टीप्‍स फाॅलाे कराव्‍या लागतील.

१) चार्जिंग उपकरणे संरक्षित करा | Electric Vehicles Charging

पावसाळ्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric vehicles in rainy season) देखभालीची पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे चार्जिंग उपकरणे सुरक्षित ठेवणे. घराबाहेर किंवा पार्किंगमध्ये चार्जिंग करणे हे ठिकाण वाहनधारकांसाठी धोक्याची घंटा ठरते. कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पार्किंगमध्‍ये पाणी साचले असेल तर बॅटरी चार्जिंग करत असताना साचलेल्या पाण्यापासून धोका निर्माण हाेवू शकतो. अशावेळी बॅटरीदेखील खराब होण्याची शक्यता अधिक असते. विशेषत: ही सर्वात मोठी समस्या इलेक्ट्रिक कार चालकांसाठी आहे. कारण अपुऱ्या जागेमुळे चार्जिंग करणे अवघड होते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी काळजीची सुरुवात ही चार्जिंगपासून होते. यावर उपाय म्हणजे पोर्टेबल बॅटरीचा वापर करणे. यामुळे बॅटरी सुरक्षित ठिकाणी चार्ज करता येते. आणि बॅटरी खराब होण्याचा धोकादेखील कमी करता येताे.

२) बॅटरीची तपासणी करा | Battery Checkup

बॅटरीची सतत तपासणी करणे आवश्यक आहे. कारण बॅटरी हा इलेक्ट्रिक वाहनांचा एक महत्त्वाचा भाग आहे. कारला ऊर्जेचा पुरवठा करणारा हा घटक व्यवस्थित काम करतो का, याची तपासणी करावी लागते. यासाठी इन्सुलेशन किंवा कनेक्टर हा तपासला पाहिजे. हे दोन बॅटरीचे महत्त्वाचे भाग आहेत. या दोन्ही मुख्य भागांची खात्री करण्यासाठी वेळोवेळी बॅटरीची तपासणी करणे आवश्यक आहे. यामध्ये काही फरक आढळून आल्यास, कार सुरू न करता अधिकृत सेवा केंद्रावर कॉल करावा, ज्यामुळे ही समस्या लवकर दूर होईल आणि वाहन व्यवस्थित काम करेल.

३)  इलेक्ट्रिक  कार स्वच्छ ठेवा

इलेक्ट्रिक  कारमधील आतील भागही तितकाच महत्त्‍वाचा असताे. कारमध्ये प्रवेश करताना आणि बाहेर पडताना आपण बाहेरून अनेक गोष्टी जसे की पाणी आणि इतर कचरा गाडीच्या आत जाऊ शकतो. त्यामुळे आतील भाग स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. दुचाकी किंवा कारमधील ओलावा यामुळेही विद्युत समस्या उद्भवू शकतात. यासाठी कारची दारे आणि खिडक्या व्यवस्थित बंद आहेत का याची नेहमी खात्री करावी. तसेच दुचाकी सतत पावसात भिजणार नाही, याची काळजी घ्‍या.

४) पाणी साचलेल्या रस्त्यावर वाहन चालवणे टाळा

पाणी तुंबलेल्या रस्त्यावर तुमची वाहने चालवणे टाळा. हा सल्ला सर्वच वाहनांना लागू होतो. यामध्ये इलेक्ट्रिक वाहन चालविणार्‍यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. रस्‍त्‍यावर साचलेल्‍या पाण्यातून वाहने चालवल्‍यामुळे हे सर्वात जास्त नुकसान ठरू शकते. EV मध्ये अनेक संवेदनशील इलेक्ट्रॉनिक्स आणि सेन्सर असतात. पाणी लागल्याने ते लवकर खराब होऊ शकतात. यामध्ये बॅटरी पॅकचे IP रेटिंग जाणून घेणे आवश्यक ठरते. त्यामुळे जर रस्त्यावर पाणी साचले असेल तर प्रवासासाठी पर्यायी मार्ग शोधणे आवश्यक आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news