Monsoon Rain Update : गुजरातमध्ये मुसळधार, आसाम पुराच्या विळख्यात; १५ जणांचा मृत्यू | पुढारी

Monsoon Rain Update : गुजरातमध्ये मुसळधार, आसाम पुराच्या विळख्यात; १५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : मुसळधार पाऊस व पूरस्थितीमुळे गेल्या 24 तासांत आणखी 4 जण मरण पावल्याने आसाममधील पाऊसबळींची संख्या 11 वर पोहोचली आहे. गुरुवारी आणखी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातेतील पंचमहालमध्ये मुसळधार पावसाने कारखान्याची भिंत कोसळून 4 मुलांचा मृत्यू झाला, तर 5 जण जखमी झाले आहेत. (Monsoon Rain Update)

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 4 जिल्ह्यांमध्ये 40 हजारांवर लोक अजूनही पुराच्या विळख्यात आहेत. (Monsoon Rain Update)

दुसरीकडे, पावसामुळे केदारनाथ यात्रा दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली आहे. भूस्खलनानंतर 17 तासांनी बद्रीनाथचा रस्ता पुन्हा खुला करण्यात आला आहे.

आकडे बोलतात…

  • 13 % कमी पाऊस (सरासरीहून) आजअखेर देशात झाला आहे.
  • 40% जास्त (सरासरीहून) पावसाची नोंद वायव्येकडील राज्यांमध्ये झाली आहे.
  • 45% कमी पाऊस (सरासरीपेक्षा) दक्षिण भारतात आजअखेर झालेला आहे.

आठवडाभर सर्वत्र पाऊस

मान्सूनने देशभराला व्यापले असून, या आठवड्यात जवळपास सर्वच राज्यांमध्ये पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटलेले आहे.


अधिक वाचा :

Back to top button