layoffs News : भारतीय स्टार्टअप्समधील २१ हजार जणांची नोकरी गेली; अनेकांच्या नोकऱ्यांवर संकट

layoffs News : भारतीय स्टार्टअप्समधील २१ हजार जणांची नोकरी गेली; अनेकांच्या नोकऱ्यांवर संकट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नव्या वर्षात आपण नोकरकपातीच्या अनेक बातम्या वाचल्या असतील. अजुनही नोकरकपातीची लाट सुरुच आहे. मुख्यत: तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. जगभरातील तंत्रज्ञान, स्टार्टअप त्याचबरोबर मध्यम आकाराच्या कंपन्यांनी आपला खर्च कमी करण्यासाठी एक पर्याय म्हणून नोकरकपातीचा निर्णय घेण्यास सुरुवात केली. काही कंपन्यांच्या सीईओंनी नोकरकपातीची संपुर्ण जबाबदारी घेत ज्या लोकांची नोकरी गेली त्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याची हमी घेतली आहे. तर काही कंपन्या फक्त मेल करत तर काहींना एका दिवसात, कारण न देतात तडकाफडकी नोकरीवरुन कामावरुन काढून टाकत आहेत. (layoffs News) एका रिपोर्टनुसार, गेल्या 3-4 महिन्यांत तब्बल टेक कंपन्यांमधील 21,000 कर्मचाऱ्यांनी  त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत. ही नोकरीकपात पुढील काही दिवस थांबेल असे वाटत नाही. येत्या काही महिन्यांत  आणखी अनेक लोकांना नोकरकपातीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

21,000 कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली

काही अहवालात अस सांगण्यात आले आहे की, गेल्या 3-4 महिन्यांत टेक कंपन्यांमधील तब्बल 21,000  कर्मचाऱ्यांनी आपल्या  नोकऱ्या गमावल्या. पण या अहवालात असही सांगण्यात आलं आहे की, येत्या काही महिन्यांत अनेक लोकांना नोकरकपातीच्या लाटेचा फटका बसण्याची शक्यता आहे. अलिकडेच  ७० हून अधिक स्टार्टअप्सनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. BYJU'S, OLA, OYO आणि Unacademy सारख्या या स्टार्टअप्सनीही त्यांच्या काही कर्मचाऱ्यांना एक नोटीस देत कामावरुन काढले.

आयएएनएसच्या अहवालानुसार, शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील (Edtech- Education technology) बहुतांश कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जात आहे. अंदाजे 16 स्टार्टअप्सनी त्यांचे मनुष्यबळ कमी केले आहे. यामुळे 8,000 कर्मचार्‍यांवर नोकरकपातीचा  परिणाम झाला आहे.

layoffs News : या कंपन्यांनी केली नव्या वर्षात नोकरभरती 

या वर्षाच्या सुरुवातीलाच अॅमेझॉनने (Amazon) 18,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आणि जगभरातील लोकांना धक्का दिला. त्यानंतर जगातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने 10,000 आणि गुगलने 12,000 हून अधिक नोकऱ्या कमी केल्या. यादरम्यान, शेअरचॅट, स्पॉटिफाई, डंझो, स्विगी, गोमेकॅनिक आणि अगदी विप्रो सारख्या कंपन्यांनीही नोकरकपातीची घोषणा केली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news