‘जमिनीच्‍या बदल्यात नाेकरी’ घोटाळा प्रकरण : ‘सीबीआय’चे ९ ठिकाणी छापे

‘जमिनीच्‍या बदल्यात नाेकरी’ घोटाळा प्रकरण : ‘सीबीआय’चे ९ ठिकाणी छापे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : 'जमिनीच्‍या बदल्यात नाेकरी' घोटाळा प्रकरणी आज ( दि. १६) केंद्रीय अन्‍वेषण विभागाने (सीबीआय) पाटणा, दिल्‍ली आणि ग्रुरुग्रामसह ९ ठिकाणी छापे टाकले. यामध्‍ये बिहारचे माजी मंत्री प्रेमचंद गुप्‍ता यांच्‍या निवासस्‍थानाचाही समावेश आहे. त्‍याचबरोबर राष्‍ट्रीय जनता दलाच्‍या (आरजेडी)आमदार किरण देवी यांच्‍या पटना आणि आरा येथील निवासस्‍थानी सीबीआयने कारवाई केली आहे. किरण देवी या माजी आमदार अरुण यादव यांच्‍या पत्‍नी असून, अरुण यादव हे 'आरजेडी' अध्‍यक्ष लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्ती मानले जातात. (Land for job case)

'जमिनीच्‍या बदल्यात नाेकरी' घाेटाळा हे २००४ ते २००९ या काळातील आहे. तत्‍कालिन रेल्‍वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांना कथितपणे भेटवस्तू किंवा विकल्या गेलेल्या जमिनीच्या बदल्यात रेल्वेमध्ये नोकरी दिल्‍या, असा आरोप आहे. या घोटाळ्याचा तपास सीबीआय करत आहे. या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्‍या आरोपपत्रात म्हटले आहे की, भारतीय रेल्वेच्या नियमांचे आणि प्रक्रियेचे उल्लंघन करून रेल्वेमध्ये नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

'ईडी'ने मार्च महिन्‍यात बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानावरही छापे टाकले होते. ही कारवाई राजकीय आकसातून करण्‍यात आल्‍याचा आरोप आरजेडीच्‍या वतीने करण्‍यात आला होता.

या प्रकरणी सक्‍तवसुली संचालनालयाने ( ईडी) एक निवेदन जारी केले होते. यामध्‍ये म्‍हटलं होतं की, लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांनी रेल्वेमंत्री असताना नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्‍या. या जमिनीची किंमत सध्या सुमारे २०० कोटी रुपये इतकी आहे. तसेच लालू प्रसाद यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या इतर मालमत्तेची यादीही जारी केली होती.ही संपत्तीही यादव कुटुंबाने नोकरी बदल्‍यात जमीन घोटाळ्यातून मिळवल्याचेही म्‍हटले होते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news