Bomb threat e-mail: दिल्लीतील शाळेला पाचव्यांदा ई-मेलवरून बॉम्बची धमकी; पोलिस घटनास्थळी दाखल, शोधमोहिम सुरू | पुढारी

Bomb threat e-mail: दिल्लीतील शाळेला पाचव्यांदा ई-मेलवरून बॉम्बची धमकी; पोलिस घटनास्थळी दाखल, शोधमोहिम सुरू

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण दिल्लीतील पुष्प विहार भागातील अमृता शाळेला ई-मेलद्वारे बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. शाळांमध्ये बॉम्ब असल्याचा हा पाचवा ई-मेल (Bomb threat e-mail) आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीतील इंडियन स्कूलला दोन तर दुसरे दोन मेल डीपीएस मथुरा रोडवरील एका शाळेला आले होते, असे वृत्त एनडीटिव्हीने दिले आहे.

दक्षिण दिल्लीतील अमृता शाळा प्रशासनाला आज (दि.१६) सकाळी सातच्या सुमारास पुन्हा एकदा बॉम्बच्या धमकीचा मेल मिळाला. शाळा प्रशासनाने दिलेल्या माहितीनंतर (Bomb threat e-mail) दिल्ली पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. दरम्यान बॉम्बशोधक पथकालाही पाचारण करण्यात आले असून, शाळेच्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

दिल्लीतील शाळांमध्ये बॉम्बची धमकी (Bomb threat e-mail) देणारा हा पाचवा मेल आहे. इंडियन स्कूलला दोन मेल आले. आतापर्यंत मेल पाठवणाऱ्यांबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. दिल्लीतील डीपीएस मथुरा रोडवरील शाळेला दोन ईमेल आले होते. याचा शोध घेतला असता, हे बॉम्बच्या धमकीचे मेल करणारे दोघेही शाळेचे विद्यार्थी असल्याचे तपासातून स्पष्ट झाले होते.

दिल्ली पोलिसांच्या बॉम्ब पथकाचे उपनिरीक्षक सुरेश यादव म्हणाले, “शाळेची कसून तपासणी करण्यात आली आहे. अद्याप घटनास्थळी कोणतीही संशयित वस्तू आढळली नाही, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

हेही वाचा:

Back to top button