ललित मोदींनी दिली होती करिअर संपवण्याची धमकी : माजी क्रिकेटपटूचा दावा

ललित गाधींनी माझं करिअरच संपवण्‍याची धमकी  दिली होती, असा दावा टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार (Praveen Kumar) याने केला आहे.
ललित गाधींनी माझं करिअरच संपवण्‍याची धमकी दिली होती, असा दावा टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार (Praveen Kumar) याने केला आहे.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पहिल्या सत्रात माझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळण्‍याची इच्‍छा नव्‍हती. मला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात सामील व्हायचे आहे कारण माझे मूळ गाव मेरठपासून जवळ आहे; परंतु मला माझा 'आरसीबी'शी करार झाल्‍याचे सांगण्‍यात आले. यासंदर्भात मी तत्‍कालीन आयपीएल कमिशनर ललित मोदी यांच्‍याशी संपर्क साधला. तेव्हा त्‍यांनी माझं करिअरच संपवण्‍याची धमकी दिली होती, असा खळखळजनक दावा टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार (Praveen Kumar) याने केला आहे.

Praveen Kumar : मला एका कागदावर सही करायला लावली….

एका मुलाखतीमध्‍ये प्रवीण कुमारने सांगितले की, "आयपीएलमध्‍ये मला आरसीबी संघाकडून खेळायचे नव्हते. कारण बंगळूर शहर हे माझ्‍या मूळ गावापासून खूप लांब होते.मला इंग्रजी येत नव्हते. तसेच तेथील जेवण माझ्या आवडीचे नव्हते. दिल्ली मेरठपासून अगदी जवळ असल्‍याने मला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात सामील व्हायचे हाेते. मात्र, मला एका कागदावर सही करायला लावली. मला माहित नव्हते की मी ज्‍या कागदावर सही केली तो आयपीएलचा करार आहे. मला नंतर समजलं की, मी मला दिल्‍लीसाठी नाही तर बंगळुरूसाठी खेळायचे आहे. मी याबाबतची तक्रार करण्‍यासाठी तत्‍कालिन आयपीएल कमिशनर ललित मोदी यांच्‍याशी संपर्क साधला. त्‍यावेळी मला मदत करण्‍याऐवजी ललित मोदींनी मला फोन करून माझी कारकीर्द संपवण्याची धमकी दिली होती."

पाकिस्तानी गोलंदाज बॉल टॅम्परिंग जास्‍त करतात

बॉल टॅम्परिंग ही खेळाडूंमध्ये एक सामान्य गोष्ट होती. पाकिस्तानी गोलंदाज त्यांच्या रिव्हर्स स्विंगला चालना देण्यासाठी इतरांपेक्षा अधिक बॉल टॅम्‍परिंग करतात. 1990 च्या दशकात वेगवान गोलंदाजांसाठी रिव्हर्स स्विंग हे घातक शस्त्र म्हणून उदयास आले आणि पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज त्यात तज्ञ मानले जात होते.पाकिस्तानी खेळाडू रिव्हर्स स्विंग मिळवण्यासाठी चेंडू एका बाजूने स्क्रॅच करत असत.

चेंडूशी छेडछाड केल्यानंतरही एखाद्याच्या गोलंदाजीमध्ये रिव्हर्स स्विंगचा योग्य वापर करण्यासाठी कौशल्य आवश्यक असते. आता सर्वत्र कॅमेरे बसवले आहेत. यापूर्वी प्रत्येकजण बॉल टॅम्‍परिंग हे करत असे. प्रत्येकजण थोडे रिव्हर्स स्विंग करतो. मात्र पाकिस्तानी गोलंदाज थोडी चांगली कामगिरी करतात, असेही त्‍याने सांगितले.

प्रत्येकाला हे देखील माहित आहे की, पाकिस्तानचे गोलंदाज चेंडू एका बाजूने कुरतड्यायचे, परंतु तुम्हाला ते कौशल्य कसे वापरायचे हे देखील माहित असणे आवश्यक आहे. मी बॉल स्क्रॅच करून कोणाला दिला तर त्याला रिव्हर्स स्विंग करायला कौशल्य लागेल, असेही त्‍याने सांगितले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news