चार शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्‍या मुलाला युपीत मतदान सुरु असतानाच जामीन

चार शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्‍या मुलाला युपीत मतदान सुरु असतानाच जामीन

लखनौ : पुढारी ऑनलाईन :  लखीमपूर हिंसा प्रकरणातील मुख्‍य आरोपी व केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलगा आशीष मिश्रा याला आज उच्‍च न्‍यायालयाने जामीन मंजूर केला. सत्र न्‍यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्‍यानंतर आशीष याने अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.

३ ऑक्‍टोबर २०२१ लखीमपूर खिरी येथे शेतकरी आंदोलनावेळी कारने चार शेतकर्‍यांना चिरडले हाेते. हिंसाचारात ८ जणांचा मृत्‍यू झाला होता. यामध्‍ये एका पत्रकाराचाही समावेश हाेता.

लखीमपूर जिल्‍ह्या मुख्‍यालयापासून ७० किलोमीटर अंतरावर नेपाळ सीमेनजीक तिकुनिया गावात ३ ऑक्‍टोबर २०२१ रोजी आंदोलक शेतकरी एकत्रीत जमले होते. शेतकरी आंदोलन करत असताना जीप, फॉर्च्यूनर आणि स्कॉर्पियो या वाहनांनी शेतकर्‍यांना चिरडले होते. एका कारमध्‍ये केंद्रीय गृहराज्‍यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा सूत्रधार होता. या हिंचासारात चार शेतकरी, भाजपचे दोन कार्यकर्ते आणि एका पत्रकाराचा मृत्‍यू झाला होता.

याप्रकरणाच्‍या तपासासाठी उत्तर प्रदेश सरकारने एसआयटीची स्‍थापना केली. एसआयटीने मागील महिन्‍यात केंद्रीय गृहराज्‍यमंत्री अजय मिश्रा यांच्‍या मुलगा आशीष मिश्रा याच्‍यासह १४ आरोपींविरोधात ५० हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्‍यात आले होते. सत्र न्‍यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्‍यानंतर आशीष याने अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावरील निर्णय उच्‍च न्‍यायालयाने राखीव ठेवला होता. अखेर आज आशिष मिश्रा याला जामीन मंजूर करण्‍यात आला आहे.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news