खेलो इंडिया : ‘वेटलिफ्टिंग’मध्ये महाराष्ट्राला रौप्य पदक, कुरुंदवाडच्या निकिता कमलाकरची कामगिरी

खेलो इंडिया
खेलो इंडिया

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा कुरुंदवाड येथील चहा-टपरी चालवणाऱ्याच्या मुलीने खेलो इंडिया स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं आहे. वेटलिफ्टिंग खेळात निकिता सुनील कमलाकर हिने 59 किलोखालील वजनी गटात महाराष्ट्राला रौप्यपदक मिळवून दिले. निकीताने आता नॅशनल स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे.

दरम्यान निकिताने उझबेकीस्थान ताश्कंद येथे आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक मिळवत वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

निकिता कमलाकर ही एका सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. तिचे वडील सुनील कमलाकर दर्गा चौकात चहा टपरी चालवतात, तर आई-आज्जी-आजोबा भाजीपाला विक्री करतात. अत्यंत गरिबीतून कष्टातून निकिताने गेली चार वर्षे वेटलिफ्टिंगसाठी तयारी सुरू केली होती. विनित इन्स्टिट्यूटमध्ये निकिता आपले प्रशिक्षण घेत आहे.

उत्तर प्रदेश गाझियाबाद येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत निकिताने 59 किलो वजनी गटात 166 किलो वजन उचलून विक्रम केला. तिने स्नॅचमध्ये 68, तर क्लीन व जर्कमध्ये 99 असे एकूण 166 किलो वजन उचलत रौप्यपदक पटकावले. निकिताच्या विजयामुळे महाराष्ट्राला वेट लिफ्टिंगमध्ये एक सुवर्णपदक मिळाले आहे. निकिताने मिळवलेल्या पदकानंतर कुरुंदवाडसह परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पेढ्याचे वाटप करण्यात आले. निकिताने वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राला नाव लौकिक मिळवून दिल्याने आम्हाला अभिमान असल्याची प्रतिक्रिया तिचे वडील सुनील कमलाकर यांनी 'पुढारी'शी बोलताना दिली.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news