PM Modi: पंतप्रधान मोदींनी केवडिया येथे सरदार पटेलांना वाहिली आदरांजली | पुढारी

PM Modi: पंतप्रधान मोदींनी केवडिया येथे सरदार पटेलांना वाहिली आदरांजली

पुढारी ऑनलाईन: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील केवडिया येथे पोहोचले. येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पोहोचून त्यांनी सरदार पटेल यांना आदरांजली वाहिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील दिल्लीत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली.

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती साजरी होत आहे. याप्रसंगी अनेक नेत्यांसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरदार पटेल यांच्या स्मृतीस्थळावर त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, गृहमंत्री अमित शहा, दिल्लीचे एलजी विनय कुमार सक्सेना, केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनीही पटेल यांना श्रद्धांजली वाहिली.

याप्रसंगी बोलताना, पंतप्रधान मोदी म्हणाले,  मी आज गुजरातमधील एकता नगरमध्ये आहे, पण माझे हृदय मोरबीतील पीडितांशी जोडला गेलो आहे. असा वेदनादायी प्रसंग मी माझ्या आयुष्यात क्वचितच अनुभवला आहे. एका बाजूला माझे करुणेने भरलेले दुःखी अंतःकरण आणि दुसरीकडे कर्तव्याचा मार्ग आहे. मोरबी दुर्घटनेत आपला जीव गमावलेल्या व्यक्तिंच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करत आहे.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात राष्ट्रीय एकता दिवस साजरा करणे हा खास प्रसंग आहे. या वर्षात आम्ही अनेक नवीन संकल्पना पुढे घेऊन जात आहोत. भारताकडे सरदार पटेलांसारखे नेतृत्व नसते, तर काय झाले असते?, 550 पेक्षांहून अधिक संस्थाने एकत्र झाली नसती तर काय झालं असतं? असा प्रश्न उपस्थित करत, आज आपण जो भारत पाहतो आहोत, त्याची कल्पनाही करू शकलो नसतो. असे म्हणत त्यांनी पटेलांचे वेगळे कतृत्त्व अधोरेखित केले आहे.

हेही वाचा:

Back to top button