Twitter Blue :ट्विटरच्या नवीन ‘ब्ल्यू टिक’ सबस्क्रिप्शनसाठी आता मोजावे लागणार 20$ | पुढारी

Twitter Blue :ट्विटरच्या नवीन 'ब्ल्यू टिक' सबस्क्रिप्शनसाठी आता मोजावे लागणार 20$

पुढारी ऑनलाइन डेस्क : Twitter Blue :  ट्विटरचा ताबा घेताच एलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये मोठे बदल घडवून आणण्यास सुरुवात केली आहे. याचे संकेत त्यांनी पूर्वीच दिले होते. ट्विटरच्या ‘ब्ल्यू टिक’ सबस्क्रिप्शनसाठीचे सदस्यत्व शुल्क लवकरच वाढवण्याची येणार आखत आहे. सध्या हे सबस्क्रिप्शन 4.99 डॉलर आहे. हे सबस्क्रिप्शन आता $19.99 इतके आकारण्यात येणार आहे. द व्हर्जने याचे वृत्त दिले आहे. मात्र, ट्विटरने अद्याप अधिकृतपणे हे जाहीर केलेले नाही.

Twitter Blue :  सध्या ज्या सदस्यांनी 4.99 डॉलरमध्ये हे सब्स्क्रिप्शन दिले आहे. त्यांना 90 दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे. त्यांना नवीन नियमानुसार सत्यापन करून घेण्यासाठी किंवा चेकमार्क गमावण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. ट्विटर ब्ल्यू हे सामान्य ट्विटरपेक्षा अधिकचे विशिष्ट फिचर्स प्रदान करते.

Twitter Blue : एलन मस्कने आपल्या ट्विटर ब्ल्यू च्या प्रकल्पावर काम करणा-या कर्मचा-यांना रविवारी 7 नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीपर्यंत हे काम पूर्ण न झाल्यास त्यांना कामावरून कमी केले जाणार आहे.

ट्विटरने खाती सत्यापित करण्याच्या प्रक्रियेत सुधारणा केली जाणार आहे, असे म्हटले आहे. त्यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे की संपूर्ण पडताळणी प्रक्रिया सध्या सुधारित केली जात आहे.

Twitter Blue : ट्विटर ब्लू टिक सबस्क्रिप्शन जवळजवळ एक वर्षापूर्वी काही प्रकाशकांचे जाहिरात-मुक्त लेख पाहण्याचा मार्ग म्हणून मोठ्या प्रमाणावर लाँच केले गेले आणि अॅपमध्ये भिन्न रंगाचे होम स्क्रीन आयकॉन सारखे बदल केले गेले. त्या पदार्पणानंतर ट्विटरने सार्वजनिक कंपनी म्हणून कमाईची नोंद केलेल्या काही तिमाहींमध्ये, जाहिराती त्याच्या कमाईचा मोठा हिस्सा राहिला. मस्क कंपनीच्या एकूण कमाईच्या निम्मे सदस्यत्व वाढवण्यास उत्सुक आहे.

सुरुवातीला ट्विटरचे हे शुल्क 2.99 डॉलर इतके होते. नंतर ते वाढवून 4.99 डॉलर इतके करण्यात आले. आता एलन मस्कने यावर कार्य करत त्याचे शुल्क 19.99 डॉलर इतके करण्याची योजना आखली आहे.

Twitter Blue : मस्क यांनी या प्रकल्पांसाठी टेस्लातील अभियंत्यांची ट्विटरवर सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. ते कोड बेसमध्ये अलीकडे योगदान न देणा-या मध्यम व्यवस्थापक आणि अभियंत्यांच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात टाळेबंदीची योजना आखत आहे. या आठवड्यात व्यवस्थापकांनी कपात करण्यासाठी कर्माचा-यांच्या याद्या तयार केल्या आहेत. या प्रकल्पांवर काम करणारे कर्माचारी रात्रि उशिरापर्यंत आणि आठवड्याच्या शेवटी काम करत आहेत.

Twitter Blue काय आहे?

ट्विटर हे सार्वजनिक मेसेज अॅप आहे. यातून मोजक्या शब्दात तुमचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवा अशी सुरुवातीची ट्विटरची संकल्पना होती. नंतर त्यामध्ये फोटो, व्हिडिओ यांच्यासारखे आणखी नवीन फिचर त्यांनी अद्ययावत केले. तसेच तुमची विशिष्ट ओळख जपण्यासाठी  ट्विटरचे सशुल्क सदस्यत्वाची योजना आखण्यात आली. त्याअंतर्गत तुम्ही सत्यापित वापरकर्ते आहात हे सत्यापन केलेल्यांसाठी ब्ल्यू टिक असे चिन्ह देण्यात येते. यासाठी ‘ट्विटर ब्ल्यू’ ही सेवा सुरू करण्यात आली. ज्यांनी ही सेवा घेतली आहे. त्यांचे खाते सत्यापित करण्यासाठी हे शुल्क लागू करण्यात आले. त्यानंतर अकाउंट व्हेरिफाय करण्यात येऊन त्यांच्या खात्यावर ब्ल्यू मार्क येत असतो. सोबतच ट्विटर जे नवीन फिचर्स घेऊन येते ते या सदस्यांना वापरता येते. जसे की पोस्ट केलेले ट्विट एडिट करणे, अन डू करणे इत्यादी…

Back to top button