Krunal Pandya: कर्णधार होताच कृणाल पंड्याच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

Krunal Pandya: कर्णधार होताच कृणाल पंड्याच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार फलंदाज केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे आयपीएलच्या (IPL) उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. आरसीबीविरुद्धच्या (RCB) सामन्यात त्याला दुखापत झाली होती. आता त्याच्या जागी कृणाल पंड्याला (Krunal Pandya) लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार बनवण्यात आले आहे. पण सीएसके (CSK) विरुद्ध कृणालला चांगली कामगिरी करता आली नाही. यासह त्याच्या नावावर एक लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

कृणाल पंड्याने (Krunal Pandya) यंदाच्या आयपीएलमध्ये 10 सामन्यांमध्ये 122 धावा केल्या आहेत. यासोबतच त्याच्या नावावर 6 विकेट्स आहेत. मात्र, बुधवारी (दि. 3) तो सीएसकेविरुद्ध शून्यावर बाद झाला. यासह, कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यात खाते न उघडताच तंबूत परतणे त्याला महागडे ठरले. अशी कामगिरी करणारा तो आयपीएलमधील तिसरा कर्णधार बनला आहे. त्याच्याआधी एडन मार्कराम आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हे सुद्धा आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून प्रदार्पणाच्या सामन्यात शून्यावर बाद झाले आहेत.

आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करताच शून्यावर बाद झालेले खेळाडू :

व्हीव्हीएस लक्ष्मण : डेक्कन चार्जर्स विरुद्ध केकेआर, 2008
एडन मार्कराम : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 2023
कृणाल पंड्या : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सीएसके, 2023

कृणालची सर्वोत्तम अष्टपैलूंमध्ये गणना (Krunal Pandya)

कृणाल पंड्या 2016 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. तो याआधी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. 2020 मध्ये मुंबईला विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात लखनऊ सुपर जायंट्सने त्याला 8.25 कोटी रुपयांना त्यांच्या कॅम्पमध्ये समाविष्ट केले. उत्कृष्ट गोलंदाजीसोबतच खालच्या क्रमाने उतरून वेगवान फलंदाजी करण्यातही तो माहिर आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलच्या 108 सामन्यात 1448 धावा आणि 67 विकेट घेतल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news