पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपटगृहात आदिपुरुष रिलीज करण्याआधी तिरुपती येथे ॲक्शन ट्रेलर रिलीज करण्यात आले. ॲक्शन ट्रेलरमध्ये प्रभू राम आणि रावण यांच्यातील लढाई पाहायला मिळते. प्रभास आणि कृती सेनॉन स्टार चित्रपट आदिपुरुची प्रतीक्षा सर्वांना लागून राहिली आहे. (Adipurush Trailer ) चित्रपट १६ जून रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज होत आहे. चित्रपटाच्या रिलीज आधी मेकर्सने ॲक्शन ट्रेलर रिलीज केले आहे. तिरुपती मेगा इव्हेंटमध्ये या चित्रपटाचा ॲक्शन ट्रेलर रिलीज करण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येत चाहते उपस्थित होते. (Adipurush Trailer)
ॲक्शन ट्रेलर २ मिनिट २४ सेकंदाचा आहे. याआधी जो ट्रेलर रिलीज झाला. आदिपुरुषचा नवा ट्रेलर राम भक्तीमध्ये लीन करतो. प्रभू रामाच्या भूमिकेत प्रभास तर माता सीतेच्या भूमिकेत कृती सेनॉन आहे. रावणच्या भूमिकेत सैफ अली खानदेखील दमदार अभिनय करताना दिसतो. चित्रपटात VFX देखील कमालीचे आहेत. आदिपुरुषचे बजेट ५०० कोटी आहे.
आदिपुरुषच्या ॲक्शन ट्रेलरवेळी क्रिती सेनॉन, प्रभास आणि चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतदेखील उपस्थित होते.
आजपासून १० दिवसनंतर आदिपुरुष मोठ्या पडद्यावर रिलीज होईल. दरम्यान, निर्मात्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. स्क्रीनिंगदरम्यान, चित्रपटगृहात एक सीट रिकामी ठेवली जाईल. ही सीट भगवान हनुमानजींना समर्पित केली जाईल.