ghulam begum badshaha : मैत्री, रहस्याची मनमोहक कथा गुलाम बेगम बादशाहचा यादिवशी प्रीमियर | पुढारी

ghulam begum badshaha : मैत्री, रहस्याची मनमोहक कथा गुलाम बेगम बादशाहचा यादिवशी प्रीमियर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अल्ट्रा झकास ओटीटी मराठी प्लॅटफॉर्मवर (ghulam begum badshaha) सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट, नाटक, बायोग्राफी प्रदर्शित होत असतात. कुलस्वामिनी, बोल हरी बोल, अदृश्य, अथिरन यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटानंतर अल्ट्रा झकास ओटीटी मराठी आता प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक नवा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाचे नाव गुलाम बेगम बादशाह असे आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. (ghulam begum badshaha)

गुलाम बेगम बादशाह चित्रपटाची कथा ३ मित्रांच्या विक्रम (भरत जाधव), समीर (संजय नार्वेकर) आणि लोरा (नेहा पेंडसे) यांच्याभोवती फिरते. लोरा स्ट्रगलिंग आणि नवीन अभिनेत्री असते. तर विक्रम पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करतो आणि समीर हा नामांकित वृत्तपत्राचा पत्रकार असतो.

मराठी चित्रपट

परिस्थिती बिकट असल्यामुळे या तिघांनाही चांगले पैसे कमवायचे असतात. आर्थिक भार कमी करण्यासाठी तिघेही विविध मार्ग शोधणं सुरू करतात. तथापि, कथेत पुजारीच्या येण्याने अनपेक्षित ट्विस्ट येतो. तो खरोखर पुजारी आहे की एक रहस्यमय अनोळखी व्यक्ती? विक्रम, समीर, लोराच्या आयुष्यात नक्की काय उलथापालथ होते? तिघांना पैसे कमवण्यासाठी मार्ग मिळतो की नाही? मार्ग शोधता शोधता त्या तिघांमधील मैत्रीवर त्याचा काय परिणाम होतो का? यासाठी मात्र तुम्हाला चित्रपट पाहायला लागेल.

“गुलाम बेगम बादशाह” १२ जून २०२३ ला अल्ट्रा झकासवर ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

Back to top button